Maharashtra Weather : मुंबईत थंडीची चाहूल! राज्यात 'या' भागात कसंय वातावरण? वाचा IMD रिपोर्ट
Maharashtra Weather Update: राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून बहुतांश जिल्ह्यातील पारा कमालीचा घसरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईत थंडीची चाहूल!
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
राज्यातील 'या' भागात IMD चा अंदाज काय?
Maharashtra Weather Update: राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून बहुतांश जिल्ह्यातील पारा कमालीचा घसरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहत होते. पण यंदा उशिराने थंडी सुरू झाली. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी थंडी सुरू झाली आहे. (maharashtra weather forecast update Today 11 november 2024 winter season minimum temperature IMD report mumbai pune kolhapur nagpur)
ADVERTISEMENT
राज्यातील 'या' भागात IMD चा अंदाज काय?
Temperature in Maharashtra and your city : जळगाव, पुणे, सांगली, नागपूर, नाशिक आदी जिल्ह्याच्या तापमानात विशेषतः घट झाली आहे. गेल्या 24 तासात नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील तापमानात निचांकी घट नोंदविण्यात आली आहे. तापमानाचा पारा घसल्याने हुडहुडी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सकाळी आणि रात्रीच्या तापमानाच मोठी घट होत थंडी जाणवू लागली आहे.
हेही वाचा : Horoscope In Marathi: मिथुन राशीच्या लोकांवर कोसळेल आर्थिक संकट! 'या' राशी होतील मालामाल, तुमचं भविष्य काय?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामान पुढचे काही दिवस कोरडे राहिल. तर पुढील 4 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
पुढील काही दिवसांत राज्यात सर्वत्र थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 15 नोव्हेंबरनंतर संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई, कोकणात दुपारी उन्हाचा तडाका जाणवतोय. तर, दुसरीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात रात्री हवेत थंडावा जाणवत आहे. राज्यात आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे असं म्हणता येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT