Maharashtra Weather Forecast : रेड अलर्ट! 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

मुंबई तक

Maharashtra weather update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

ADVERTISEMENT

मुंबई आणि महाराष्ट्रात २३ जुलै २०२४ रोजी हवामान कसे असेल?
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज

point

मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज

point

हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Heavy Rain Weather Update: राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. (Heavy to Very Heavy rainfall predicted in many districts of maharashtra) 

महाराष्ट्र हवामान अंदाज - 23 जुलै 2024

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. बंगालच्या उपसागरात मी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पाऊस कोसळत असून, पुढील 24 तासांमध्येही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

मुंबईत आज हवामान कसे असेल? (Mumbai Weather forecast Updates)

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ताशी 45-55 किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे.

हेही वाचा >> "शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार मग अजितदादा कोण?" 

हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट दिला असून, सलग तिसऱ्या दिवशी सकाळी सूर्य दर्शन झाले नाही. मुंबईत सकाळीच पावसाला सुरूवात झाली होती.

रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, प्रशासन दक्ष झाले आहे.

हेही वाचा >> तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! गर्भवती प्रेयसीचा मृत्यूनंतर दोन मुलांना फेकलं नदीत 

पुणे जिल्ह्यातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

विदर्भ, मराठवाड्यात कसा असेल पाऊस?

त्याचबरोबर ठाणे,पालघर,नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

maharashtra weather for this week
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, पहा नकाशा.

हेही वाचा >> 'लाडकी बहीण' नंतर महिलांसाठी आणखी एक योजना, काय आहे पिंक रिक्षा योजना? 

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp