Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर, एप्रिल महिन्यापूर्वीच पारा वाढला, 'या' 5 जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेनं कहर केला असून उष्णतेचा पारा वाढला आहे. राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज अपेक्षित असेल. तसेच कोकणातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 11 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.  

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात उष्णतेचा कहर

point

उष्णतेचा पारा चढला

point

जाणून घेऊयात 11 मार्च 2026 रोजी राज्यातील हवामान

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेनं कहर केला असून उष्णतेचा पारा वाढला आहे. राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज अपेक्षित असेल. तसेच कोकणातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 11 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.  

हे ही वाचा : इराण आणि इस्रायल युद्धाचा भडका थेट LPG गॅस सिलिंडरवर, 25 दिवसांपूर्वी संपला तर काय करावं?

कोकण :  

कोकणातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबई, रायगड, ठाणे, आणि पालघारला उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आर्द्रता वाढ झाल्यास उकाडा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज राहील. तसेच या विभागातील महत्त्वाचे शहर पुणे असून या पुण्यातील तापमान कमाल 35-38 अंश सेल्सियस तर किमान तापमान हे 8-21 अंश सेल्सियस तापमान राहील.

मराठवाडा : 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये हवामान उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp