Maharashtra Weather : राज्यात पावसाचा कहर, 16 जिल्ह्यांवर आस्मानी संकट

मुंबई तक

Maharashtra Weather : कोकण, पश्चिम महाराष्ट्र घाटमाथा परिसर आणि इतर काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याची माहिती समोर आली. अशातच आता पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता आहे.  

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात विविध भागांमध्ये पावसाची हजेरी

point

16 जिल्ह्यांवर आस्मानी संकट

Maharashtra Weather : काही दिवसांपासून राज्यात विविध भागांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावलेली दिसून येत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र घाटमाथा परिसर आणि इतर काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याची माहिती समोर आली. अशातच आता पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता आहे.  

हे ही वाचा : राहुल गांधींच्या घराबाहेर जबरदस्त ड्रामा, आता पोलिसांनी नेमकं केलं तरी काय?

कोकण 

कोकण विभागातील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर मुंबईसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची अधिक शक्यता दिसून येत आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंजची शक्यता वर्तवण्यात आली. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात यलो अलर्ट, तर सातारा घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.