Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांना उन्हाचा चटका; तर काही भागांत अवकाळीचं सावट
Maharashtra Weather : कोकण विभागात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला, तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. अशातच जाणून घेऊयात 15 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतो
15 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
Maharashtra Weather : राज्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरडं तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापैकी कोकण विभागात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला, तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. अशातच जाणून घेऊयात 15 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे...
हे ही वाचा : बायकोनं दारूत विष मिसळून नवऱ्याला संपवलं, त्यावरच लिहिलं पुस्तक
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांतील काही ठराविक भागांमध्ये उष्णतेचा अधिकचा तडाखा जाणवेल. या विभागाला हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता जाणवेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढे पुणे, सातारा या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात ककाही तुरळक भागांत उष्णतेची लाट, तसेच दुपारी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या जिल्ह्याला हवामान विभागाने उष्णतेची लाट वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.









