Maharashtra Weather: कोकणात पावसाची विश्रांती, मध्य महाराष्ट्रातील 'या' जिल्हांना अलर्ट
Maharashtra Weather Today: राज्यात हवामान विभागाने 9 ऑक्टोबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज दर्शवला आहे, जाणून घेऊया हवामान विभागाचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज

9 ऑक्टोबर रोजी कसं असेल हवामान?
Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने 9 ऑक्टोबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज दर्शवला आहे. तसेच राज्यातील भारतीय विभागातील (IMD) अंदाजानुसार कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हावामानाच्या एकूण अंदाजाबाबत महत्वाची अपडेट पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
हे ही वाचा : आईचे जावयासोबत होते प्रेमसंबंध, लेकीला समजताच पायाखालची जमीनच सरकली, दोघांमध्ये नेमकं काय घडलं?
कोकण :
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज जारी केला आहे. यापैकी पालघर, ठाणे, मुंबईमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रायगड आणि रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह हलका पाऊस दाखल होईल, तसेच सिंधुदुर्गात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात हलका पाऊस असण्याची हवामान विभागाने अंदाज जारी केला. तर लातूर आणि धाराशिव मध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.