Maharashtra Weather : विदर्भाला पुन्हा बसणार उन्हाचा तडाखा! मुंबईसह 'या' ठिकाणी कसं असेल आजचं तापमान?
Maharashtra Weather Today: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटा पसरल्या असून विदर्भ आणि कोकणात पारा चांगलाच वाढल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात कोणत्या जिल्ह्यात उसळणार उष्णतेची लाट?
मुंबईत आजचं तापमान काय?
या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान
Maharashtra Weather Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटा पसरल्या असून विदर्भ आणि कोकणात पारा चांगलाच वाढल्याचं चित्र आहे. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा दिला आहे. काल चंद्रपूरमध्ये 16 मार्च 2025 ला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता.
अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला आणि नागपूरमध्ये उष्णता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. दरम्यान आज 17 मार्च 2025 ला राज्यातील हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदियामध्ये आज कोरडं हवामान असणार आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5… … भेट घ्या. pic.twitter.com/CGAdBPXopx
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 16, 2025










