Maharashtra Weather: गौराईच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा आजचा IMD चा अंदाज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई, ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

point

कोकणाला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

point

गौराईच्या आगमनाला पावसाची स्थिती काय?

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप दिसत होती. पण आता चांगलाच पाऊस बरसताना दिसत आहे. मुंबईतील काही भागांत तसंच ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे. अशावेळी आज (10 सप्टेंबर) गौराईचं आगमन आहे. या खास प्रसंगी तुमच्या शहारात पावसाची स्थिती कशी असेल? जाणून घेऊयात. (maharashtra weather update imd alert weather report today 10 september 2024 Gaourai Agman)

ADVERTISEMENT

मुंबई, ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह संपूर्ण कोकणाला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या भागांतील नद्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहणार असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हेही वाचा : Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता फक्त...

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होताना दिसत आहे.   

हे वाचलं का?

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील पावसालाही वादळी वाऱ्यांची साथ असल्यामुळं नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT