Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता फक्त...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत प्रशासनाकडून मोठा बदल

point

लाडकी बहीण योजनेत आता नवीन ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावे लागणार

point

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ कोणाला ?

Mukhymantri Mazi ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सध्या प्रशासनाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. बोगस अर्जांचे प्रमाण वाढल्याने महिला व बाल विकास विभागाने आता विविध वर्गांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी काढून घेतली आहे. आता हे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाकडेही अर्ज भरता येणार नाहीत. (big change by the administration in the Mazi Ladki Bahin yojna know about it in detail)  

ADVERTISEMENT

तसंच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता नवीन ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावे लागणार आहेत. ज्या महिलांनी आतापर्यंत हे योजनेचे अर्ज भरले नाहीयेत त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. त्यामुळे आता नवीन फॉर्म कसा भरायचा? फॉर्म भरण्याची नेमकी पद्धत कशी आहे? समजून घेऊयात. 

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' दिवशी 4500 महिलांच्या खात्यात डिपॉझिट होणार?

लाडकी बहीण योजनेत सरकारने नवीन जीआर काढला आहे. या जीआरनुसार आता सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत किंवा ज्यांनी अजूनही अर्ज भरलेले नाहीयेत त्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हे वाचलं का?

नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागले. अर्जदार नवीन असल्यास खाते तयार करा, यावर क्लिक करा. आणि आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत लिहून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा. तसेच पुढील येणाऱ्या पर्यायांमध्ये माहिती भरून तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता.

हेही वाचा : Gold Price Today: सोन्याचे भाव स्थिरावले! खरेदीआधी एका क्लिकवर तपासा आजचे दर...

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा लाभ कोणाला ?

  • माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. यासाठी डोमेसाइल असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरू शकतात.
  • महिलाचे किमान वय 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
  • माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
     

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT