Maharashtra Weather : राज्यातील 'या' ठिकाणी ऊन तर लवकर पाऊस लावणार हजेरी
Maharashtra Weather : राज्यात वातावरण स्थिर असलेलं पाहायला मिळत आहे, जून महिना संपत आला तरीही अद्यापही पावसाचा पत्ता नाही. राज्यात सध्या पावसाने हजेरी लावणे अपेक्षित होते. मात्र सध्या राज्यात उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. अशातच जाणून घेऊयात 21 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जून महिना संपत आला तरीही अद्यापही पावसाचा पत्ता नाही
राज्यात सध्या पावसाने हजेरी लावणे अपेक्षित
Maharashtra Weather : राज्यात वातावरण स्थिर असलेलं पाहायला मिळत आहे, जून महिना संपत आला तरीही अद्यापही पावसाचा पत्ता नाही. राज्यात सध्या पावसाने हजेरी लावणे अपेक्षित होते. मात्र सध्या राज्यात उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. अशातच जाणून घेऊयात 21 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : 'षडयंत्र रचणारे कोण? मी नंतर बोलेन..', राणाजगजीतसिंह पाटील काय म्हणाले?
कोकण
कोकणातील ठाणे, मुंबई, रत्नागिरी या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग, रायगड या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हवामान कोरडं राहील. तसेच उन्हाचा चटका कामय राहील अशी शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.