Manoj Jarange : 'तू चूक केली', भांबेरीतून जरांगेंनी फडणवीसांना काय दिला इशारा?
Manoj Jarange Paitl latest news : मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय बदलला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मनोज जरांगे यांनी मुंबईचा दौरा थांबवला

देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका

संचारबंदीमुळे जरांगे यांनी बदलला निर्णय
Manoj Jarange Patil Latest News : (इसरार चिश्ती, भांबेरी) 'देवेंद्र फडणवीसांना माझं एन्काऊंटर करायचं आहे. मी सागर बंगल्यावर येतो. घे म्हणावं जीव माझा', असं म्हणत मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र, सोमवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. माघारी फिरताना जरांगेंनी त्यांची भूमिका मांडली.
भांबेरी येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून... त्याचा (देवेंद्र फडणवीस) जाऊ द्या. सगळ्या राज्यात शांत राहायचं. आपण आता अंतरवालीत जाऊ. तिथे एक निर्णय घेऊ."
हेही वाचा >> '...पाठीत खंजीर खुपसणे असा उद्देश नव्हता', अजित पवारांचं मोठं पत्र
"सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तर आपण घेऊच आणि आरक्षण कसं देत नाही, तेही बघू. मराठ्यांवर किती अन्याय केला जातो, याबद्दल सावध रहा. काही परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागते. हट्टवादी भूमिका घेऊन लोकांना अडचणीत आणायचे नाही", असे मनोज जरांगे म्हणाले.
जरांगेंनी फडणवीसांना काय दिला इशारा?
"दम लागतो ना त्याला. स्वागत आहे म्हणे सागर बंगल्यावर, हे स्वागत आहे का? तो रात्री करणार होता हे. त्याच्यापेक्षा दहापट मी हुशार आहे. फक्त तू गृहमंत्री झालेला आहे", असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं.