मुंबईकडे येत असतानाच प्रसूतीकळा; रेल्वे स्थानकात दिला गोंडस बाळाला जन्म
महाराष्ट्रात कर्नाटकहून मुंबईकडे निघालेल्या चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसमध्ये धावत्या गाडीत एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. महिलेला नऊ महिने पूर्ण झाले होते. यानंतर महिलेने अगदी गोंडस बाळाला जन्म दिला.
ADVERTISEMENT
Woman Passenger gave Birth In Railway : बाईसाठी आईपण हे खूप खास असतं. प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय क्षण असतो. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं आहे. ज्यानंतर हा क्षण तिच्या कायमच लक्षात राहील. महाराष्ट्रात कर्नाटकहून मुंबईकडे निघालेल्या चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसमध्ये धावत्या गाडीत एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. (Maternity in Chennai-Mumbai Express woman passenger gave birth to a baby)
ADVERTISEMENT
महिलेला नऊ महिने पूर्ण झाले होते. याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला देण्यात आली. यावेळी रेल्वेस्थानकावर गाडी थांबताच महिलेची अश्विनी सहकारी रुग्णालयाचे डॉक्टर, लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी मिळून प्रसूती केली.
Asian Games 2023: भारताने नेमबाजीत खातं खोललं, ‘रौप्य’मुळे उंचवल्या आशा
यानंतर महिलेने अगदी गोंडस बाळाला जन्म दिला. आता दोघंही सुखरूप आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे महिला प्रवाशाची सुखरूप प्रसूती झाली. आता पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे वाचलं का?
महिलेच्या प्रसूतीसाठी महिला पोलिसांनी अशी केली सोय…
बाळाला जन्म दिलेल्या महिलेचं नाव सुनीता मल्लिकार्जुन फते (वय 25) आहे. ती शनिवारी (23 सप्टेंबर) चेन्नई-मुंबई एक्सप्रेसने यादगीर(कर्नाटक) येथून मुंबईला जाण्यासाठी वडिलांसोबत निघाली होती. तेव्हा अचानक तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. हे पाहून तिथे उपस्थित लोहमार्ग दलातील महिला पोलिसांनी सुनीताला चादरीचा आडोसा देऊन प्रसूतीची सोय केली.
Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार, नागपूरमध्ये पुन्हा मुसळधार
रेल्वेतील प्रवासीही महिलेच्या मदतीला आले धावून!
प्रवासादरम्यान प्रसूतीकळा जाणवू लागल्याने प्रवाशांनी मदतीचा हात पुढे केला. सुरुवातीला सुनीता घाबरली होती. पण तिथल्या प्रवाशांनी तिला धीर दिला. यावेळी स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी अश्विनी सहकारी रुग्णालयाशीही संपर्क साधून डॉक्टरांना बोलावलं. धावत्या रेल्वेत प्रसूती झाली आणि यानंतर सोलापूर रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावर सुनीताला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
ADVERTISEMENT
Maratha Morcha : ‘…आता माघार घेणार नाही’, जरांगे पाटलांचा पुन्हा थेट इशारा
महिला व तिचे बाळ सुखरूप आहे. रेल्वे प्रशासनाने 108 क्रमांकावर संपर्क करून डॉक्टरांना बोलावलं. महिलेला आणि तिच्या बाळाला तत्काळ अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या कौतुकास्पद कामगिरीचं श्रेय पोलीस नाईक क्षीरसागर रेल्वे पोलीस ठाण्याचे महिला कर्मचारी व आरपीएफ स्टाफ यांनाही जातं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT