पुणे : भरधाव कारने स्थलांतरित मजुरांना चिरडले, तीन जण ठार

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

car accident in pune district. three migrant workers died.
car accident in pune district. three migrant workers died.
social share
google news

Pune Accident : कल्याण-अहमदनगर महामार्गावर भरधाव येणाऱ्या कारने 5 परप्रांतीय मजुरांना चिरडले. त्यामध्ये 2 मजूर जागीच ठार झाले, तर एका मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर 2 जण गंभीर जखमी झाले असून, जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (three migrant workers died in car accident)

जखमी मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती आहे. डिंगोरे येथे मध्य प्रदेश वरून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही हे मजूर कामासाठी आले होते.

कल्याणकडून येत होती कार

डिंगोरे हद्दीतील दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलाजवळ रविवारी (24 सप्टेंबर) रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास कल्याणवरून ओतूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.12 व्ही.क्यु.8909) महामार्गाच्या बाजूने पायी चालत असलेल्या पाच परप्रांतीय मजुरांना जोरदार धडक दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भारतातील गणेशोत्सवाचा इतिहास, लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्यातील वाद काय?

या अपघातात जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले हे तिघेजण ठार झाले. दिनेश जाधव व विक्रम तारोले हे दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >> Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?

घटनेची माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन कांडगे यांची टीम घटनास्थळी पोहोचली व त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्थांना मदत केली.

ADVERTISEMENT

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

गेल्या चार-पाच दिवसांत कल्याण महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. प्रशासनाने गावांच्या परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT