Mumbai 26/11 Attack: 10 अतिरेक्यांनी मुंबईला 60 तास धरलं वेठीस… 15 वर्षापूर्वी कसा झाला होता हल्ला?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbai 26/11 Terror Attack How was the attack Happen 15 years ago Know the Details
Mumbai 26/11 Terror Attack How was the attack Happen 15 years ago Know the Details
social share
google news

26/11 Mumbai Terror Attack : 26 नोव्हेंबर 2008, संपू्र्ण भारत ही तारीख कधीही विसरू शकणार नाही. आजही तो क्षण आठवताच अंगावर काटा येतो. यादिवशी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले. देशाची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai Terror Attack) या भीषण आणि क्रूर दहशतवादी हल्ल्यांची साक्षीदार बनली होती. आज (26 नोव्हेंबर 2023) हा दहशतवादी हल्ला होऊन 15 वर्ष उलटली आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. (Mumbai 26/11 Terror Attack How was the attack Happen 15 years ago Know the Details)

9 दहशतवाद्यांचा खात्मा करत कसाबला जीवंत पकडलं!

या हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 166 लोक मारले गेले तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. पोलिसांनी चकमकीत 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर, अजमल कसाब या दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात यश आलं. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील हवालदार तुकाराम ओंबळे यांनी 26 नोव्हेंबरच्या रात्री आपल्या छातीवर गोळ्या झेलून कसाबला जीवंत पकडलं होतं. देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या ताजमहाल हॉटेलला लक्ष्य करून या दहशतवाद्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा चक्काचूर केला होता.

वाचा : Lok Sabha : महायुतीचा फॉर्म्युला ठरला! फडणवीसांनी सांगितलं शिंदे-पवारांना किती जागा?

दहशतवाद्यांनी भारतात कसा केला प्रवेश?

26 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानात प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले लष्कर-ए-तैयबाचे 10 दहशतवादी बोटीच्या साहाय्याने समुद्रमार्गे मुंबईत घुसले. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या दहशती आणि क्रौर्याच्या खुणा सोडल्या होत्या. त्यांनी गर्दीची ठिकाणे आणि प्रतिष्ठित इमारतींना लक्ष्य केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा : Pune: ठोसा मारताच मोडलं नाक अन्… दुबईत बर्थडे करायचा होता पतीने नकार देताच महिलेचं जीवघेणं कृत्य!

मुंबईत 26/11 च्या ‘त्या’ रात्री काय घडलं?

या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 160 हून अधिक लोक मारले गेले आणि 200 हून अधिक जखमी झाले. 26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री मुंबईत सर्व काही सुरळीत चालले होते. अचानक संपूर्ण शहरात गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुंबईत एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची सुरुवातीला कुणालाही कल्पना नव्हती. रात्री 10 च्या सुमारास बोरी बंदर येथे टॅक्सीमध्ये स्फोट झाल्याची बातमी आली, ज्यात चालक आणि दोन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.

वाचा : Crime : मुलगा होता बेपत्ता, कुटुंब शोधत शेतात पोहोचलं अन् मातीचा ढीग… पोलिसांना फुटला घाम

रात्री उशिरा दहापैकी चार दहशतवादी ताजमहाल हॉटेलमध्ये आले, दोन दहशतवादी ओबेरॉय ट्रायडेंटला गेले, नरीमन हाऊसला दुसरे दोघेजण गेले तर, उरलेले दोघे आझम आणि इस्माईल टॅक्सी करून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाले. हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं. 26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली. या हल्ल्याचे व्रण मुंबईकरांच्या मनात अजूनही ताजे आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT