मुंबईची खबर : जेनपीए ते मुंबई दरम्यान फेरीच्या मार्गात बदल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई तक

जेएनपीए बंदर आणि मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया दरम्यान धावणाऱ्या प्रवासी फेरी सेवेच्या मार्गात बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : जेनपीए ते मुंबई दरम्यान फेरीच्या मार्गात बदल

point

जाणून घ्या सविस्तर

Mumbai News : सध्या सर्वत्र मान्सूनच्या आगमनाविषयी चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीने (JNPA) जेएनपीए बंदर आणि मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया दरम्यान धावणाऱ्या आपल्या प्रवासी फेरी सेवेच्या मार्गात तात्पुरता बदल करण्याची घोषणा केली आहे. जेएनपीएच्या सागरी विभागाचे कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेचा उपाय म्हणून 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत ही नियमित फेरी सेवा गेटवे ऑफ इंडियाऐवजी भाऊचा धक्का येथून चालवली जाईल. पावसाळा संपल्यानंतर ही सेवा पुन्हा पूर्ववत म्हणजेच मूळ मार्गावरून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

4 ते 5 मीटरपर्यंत उंच लाटा

पावसाळ्यात समुद्रात तीव्र वारे सुटते. तसेच प्रचंड मोठ्या लाटादेखील उसळतात. या काळात समुद्रात 4 ते 5 मीटरपर्यंत उंच लाटा उसळत असल्याने गेटवे ऑफ इंडिया येथे जहाजे किंवा बोटी सुरक्षितपणे लावणे अत्यंत धोकादायक ठरते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा धमाका, किती जागा बिनविरोध? संपूर्ण यादी

37 वर्षांपासूनची अखंड सेवा

जेएनपीए-मुंबई दरम्यानची ही फेरी सेवा गेल्या 37 वर्षांपासून अखंडपणे कार्यरत आहे. ही सेवा अत्यंत किफायतशीर आणि वेळेची बचत करणारी असल्याने बंदरातील अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने याचा वापर करतात. जलवाहतुकीच्या या सुविधेमुळे केवळ एका तासात हा प्रवास पूर्ण होतो, ज्यामुळे रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा मार्ग अधिक जलद, सोयीचा आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो.

हे ही वाचा : खूपच चांगली बातमी! महाराष्ट्रात लवकरच कोसळणार धो-धो पाऊस.. अखेर मान्सून केरळात दाखल!

सेवा खंडित न होता फक्त मार्ग बदलणार

पावसाळ्याच्या दिवसांत गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग आणि एलिफंटा यांसारख्या इतर अनेक जलमार्गांवरील फेरी सेवा सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद ठेवल्या जातात. मात्र, जेएनपीएची ही सेवा पूर्णपणे खंडित न करता केवळ बदललेल्या मार्गाने सुरू राहणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि प्रवासातील सुलभतेसाठी जेएनपीए निवासी वसाहतीपासून ते जेट्टीपर्यंत नियमित अंतराने विशेष बस सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. बंदराच्या परिसरात काम करणाऱ्या हजारो लोकांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची असून, ती दैनंदिन प्रवासासाठी एक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे.
 

हे वाचलं का?