Mumbai Rain : मुंबईकरांनो, काम असेल तरच बाहेर पडा! IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai rain news tommorrow huge rain in mumbai and thane region india meteorological department maharashtra rain
मुंबई आणि ठाणे भागात मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस पडणार आहे.
social share
google news

Mumbai Rain News : मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्या रविवारचा दिवस मुंबईकरांसाठी फार महत्वाचा आहे. कारण उद्या 9 जून 2024 ला मुंबईत आणि ठाण्यात मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना जर शक्य असेल तर घरा बाहेर पडा, अन्यथा पावसामुळे गैरसोय होण्याची शक्यता आहे. (mumbai rain news tommorrow huge rain in mumbai and thane region india meteorological department maharashtra rain) 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि ठाणे भागात मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर भोवरा तयार होईल ज्यामुळे मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांवर शिअर झोन देखील सक्रिय होत असल्याने मुंबई भागातच सर्वाधिक पाऊस पडेल,अशी माहिती देण्यात आली आहे.  

हे ही वाचा : '...तर थेट नाव घेऊन पाडणार', जरांगेंचा आमदारांना धडकी भरवणारा इशारा

मुंबई भागात 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. तर इतर भागात 150 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जर पावसाचा जोर आणखीण वाढण्याची शक्यता वाटल्यास अलर्ट देखील जारी करण्यात येणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 'या' 5 नेत्यांपैकी कोण होऊ शकतो उपमुख्यमंत्री?, पण...

अवघे 48 तास बाकी... 

मान्सून मुंबईच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आणि येत्या 48 तासात तो मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत येणाऱ्या या पावसाने उन्हाच्या काहिलीने त्रासलेला मुंबईकर सुखावणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पावसाची उत्सुकता लागली आहे.  

'या' जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा 

हवामान विभागाने सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  दिला आहे. यासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि इतर अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT