Mumbai Weather Forecast : मुंबईकरांनो, रविवारही अतिमुसळधार पावसाचाच!

मुंबई तक

Mumbai Weather Updates : मुंबईत पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत पुढील २४ तास अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मुंबईत २१ जुलै २०२४ रोजी कसे असेल हवामान?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई हवामान अंदाज 21 जुलै 2024

point

मुंबईत पाऊस कसा असेल, हवामान विभागाचा अंदाज काय?

point

महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज पहा

Mumbai Weather Latest News : गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईत पुढील काही तास अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय विभागाने वर्तवला आहे. (IMD Predicts Heavy to very Heavy rainfall in Mumbai)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पुढील काही तासही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

मुंबईतील हवामानाचा अंदाज काय?

मुंबईसाठी २० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. पुढील २४ तासांत म्हणजे २१ जुलै रोजीही अतिमुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे.

हेही वाचा >> आधी जरांगेंना पाठिंबा आता विरोध, आंबेडकरांच्या यात्रेचा अर्थ काय? 

मुंबई उपनगरातही पावसाचा जोर कायम राहिल. हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp