Nagpur हादरलं, बेपत्ता 3 चिमुकल्यांचे कारमध्येच सापडले मृतदेह; नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये शनिवारी बेपत्ता झालेल्या 3 मुलांचे त्यांच्या घराच्या नजीकच कारमध्ये मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नागपूर पोलीस सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
Latest Marathi News: नागपूर: नागपुरात (Nagpur) शनिवारी (17 जून) दुपारपासून बेपत्ता असलेल्या तीनही लहान मुलांचा एकाच वेळी मृत्यू (3 Children Death) झाल्याची धक्कादायक घटना काल (18 जून) संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण नागपूरमध्ये एकच खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये गुदमरून तीन या तीनही मुलांचा मृत्यू झाला आहे. 17 जून रोजी दुपारपासून ही तीनही मुले बेपत्ता होती. पण आता त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचं गांभीर्य प्रचंड वाढलं आहे. (nagpur missing 3 children death found dead body car near house)
ADVERTISEMENT
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात पोलिसांना या तीनही मुलांचा त्याचा मृतदेह त्यांच्या घरापासून 50 मीटर अंतरावर एका एसयूव्ही फोर्ड कारमध्ये सापडला. मृत पावलेल्या तीन चिमुकल्यांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
पालकांना अपहरणाचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफीक फिरोज खान (वय 4 वर्ष), आलिया फिरोज खान (वय 6 वर्ष) आणि आफरीन इर्शाद खान (वय 6 वर्ष) ही तिघेही नागपूरमधील फारूख नगर येथे राहत होते. जे शनिवारी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण संध्याकाळ झाली तरी ही तीनही मुलं घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी मुलांची शोधाशोध सुरू केली. पण बराच वेळ झाला तरी मुलं न सापडल्याने त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनात धाव घेत अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Pune : MPSC मध्ये सहावा क्रमांक! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा सापडला मृतदेह
घरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या कारमध्येच सापडले मुलांचे मृतदेह
अपहरणाची तक्रार दाखल होताच पाचपावली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलांची चौकशी सुरू केली. तेव्हा एका हवालदाराला एक एसयूव्ही कार घरापासून काही अंतरावर उभी असल्याचं दिसून आलं. ज्याच्या आत तीन मुले निपचितपणे पडलेली आढळली. पोलिसांनी जेव्हा गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा ही तीनही मुले मृतावस्थेत असल्याचे आढळले.
कारमध्ये गुदमरुन मुलांचा मृत्यू?
दरम्यान, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘खेळत असताना मुलांनी कारचा दरवाजा आतून बंद केला असावा आणि नंतर तो उघडता आला नाही. त्यातच उष्णता आणि गुदमरून या तीनही मुलांचा मृत्यू झाला असावा. मृतांपैकी तौफिक आणि आलिया ही भावंडे आहेत, तर आफरीन ही त्यांच्या शेजारीच राहत होती. मात्र, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> “नकली वाघांचा एक मिंधे प्रयोग”, शिवसेनेने (UBT) वर्धापन दिनी शिंदेंना काय दिला इशारा?
दरम्यान, ही घटना काही घातपाताचा प्रकार तर नाही ना.. या दृष्टीने देखील नागपूर पोलीस प्रयत्न करणार आहेत. तसेच नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
या घटनेनंतर नागपूर शहरातील पाचपावली परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT