…म्हणून संसद भवनसमोर फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या, नेमका काय घडला प्रकार?
लोकसभेवर हल्ला होऊन 22 वर्षे उलटली असतानाच आज पुन्हा संसदेत दोघांनी प्रवेश गॅलरीतून घुसखोरी करत संसदेच्या सदस्यांच्या टेबलवर उडी मारत संसदेच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
Parliament Winter Session 2023 : संसद भवनासमोर महिला आणि एका पुरुषाने घोषणाबाजी करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने जोरदार गोंधळ उडाला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपले मत ऐकून घेतले जात नसल्याने हा मार्ग निवडल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेऊन तेथून पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले.
ADVERTISEMENT
घोषणा संसदेतही आणि बाहेरही
या दोघा महिला आणि पुरुषांनी पहिल्यांदा संसद भवनाबाहेर फटाके फोडले होते, त्यानंतर त्यांनी भारत माता की जय, जय भीम, हुकूमशाही चालणार नसल्याच्या घोषणा दिल्या. हा गोंधळ परिवहन भवनजवळ घडल्याने जोरदार गोंधळ उडाला होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने त्यांनी हा मार्ग निवडला असल्याचे या दोघांनी सांगितले.
हे ही वाचा >> “शिवाजी महाराज रेडे कापायला सुरतेवरून गुवाहाटीला गेले नव्हते”, राऊत-पटोले संतापले
म्हणून हे पाऊल उचललं
संसद भवनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या महिलेचे नाव नीलम आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला आणि तिच्या बरोबर आंदोलन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
हे वाचलं का?
याच दिवशी झाला होता हल्ला
संसदेवर 22 वर्षापूर्वी म्हणजेच 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, यावेळी संसदेतील अनेक सदस्यही उपस्थित होते. त्यामुळे या दोघांनी घुसखोरी केल्यामुळे संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा >>Lok Sabha Security Breach : सुरक्षकांना चकमा देत लोकसभेत घुसखोरी! अश्रू धुरांचे लोळ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT