राणा दाम्पत्याला न्यायालयाचा झटका, याचिका फेटाळली, नेमकं प्रकरण काय?

विद्या

ADVERTISEMENT

Petition of Navneet and Rana couple rejected in Hanuman Chalisa case
Petition of Navneet and Rana couple rejected in Hanuman Chalisa case
social share
google news

Navneet Rana : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणी न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांची याचिका फेटाळण्यात आली असून राणा दांपत्याविरोधात पुरावे व साक्षीदार असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून (Petition dismissed) लावण्यात आली आहे.

दोघांविरोधात ठोस पुरावे

नवनीत आणि रवी राणा दांपत्याने याप्रकरणी आपल्या दोघांना दोषमुक्त करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्याता आली होती. त्यांच्या त्या याचिकेवर न्यायालय आज निर्णय देणार होते, पण आज न्यायालयाकडून दोघांविरोधात ठोस पुरावे असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. यापुढची सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा >> India आघाडीच्या बैठकीतील Exclusive बातमी, ‘हा’ नेता पंतप्रधानाचा उमेदवार?

हनुमान चालीसा पठण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार अशी त्यांनी घोषणा केली होती. त्या प्रकरणी त्यांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कलम 153 अ आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दांपत्याच्या याचिकेला विरोध

न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर राणा दांपत्याने आपल्याला या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यात यावे यासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्या दोघांविरोधात पुरावे आणि साक्षीदार असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पोलिसांकडूनही राणा दांपत्याच्या याचिकेला विरोध करण्यात आला होता. पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी दोघांनाही आता न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

दोन्ही वेळेलाही गैरहजर

हनुमान चालीसा प्रकरणी राणा दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना दोन वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र खासदार व आमदार असलेले राणा दांपत्य दोन्ही वेळेलाही गैरहजर राहिल्याने न्यायाधीश राहुल रोकडे यांनी खडे बोल सुनावत न्यायालय म्हणजे मस्करी नाही अशा शब्दात त्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतर आता त्यांना 5 जानेवारी रोजी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2022 च्या एप्रिल महिन्यात राणा दांपत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरत त्यांच्या त्या घोषणेला जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, एवढे होऊनही राणा दांपत्याने माघार न घेतल्याने हा वाद विकोपाला गेला होता. यावेळी धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता व त्यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> IPL Auction 2024 : मल्लिका सागरकडून मोठी चूक, RCB ला बसला ‘इतक्या’ लाखांचा फटका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT