PSI Somnath Zende : Dream 11 वर 1.5 जिंकलेल्या PSI झेंडेंना 2 चुका भोवल्या, मोठी कारवाई
psi somnath zende suspended : पिंपरी चिंचवड पोलीस खात्यात पीएसआय असलेल्या सोमनाथ झेंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. ड्रीम११ वर दीड कोटी जिंकल्यानंतर पोलीस विभागाने ही कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
PSI Somnath Zende Suspended : Dream 11 वर दीड कोटी रुपये जिंकणाऱ्या पीएसआय सोमनाथ झेडेंच्या आनंदावर विरजण पडलंय. पीएसआय झेंडे यांची नोकरीच धोक्यात आली आहे. झेंडे यांना दोन चुका भोवल्या असून, पोलीस खात्याने त्यांना निलंबित केले आहे. (PSI Somnath Zende, who won 1.5 crore on dream11 suspended by police department.)
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवड पोलिसांत कार्यरत असलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे ड्रीम ११ वर या ऑनलाईन गेममध्ये १.५ कोटी रुपये जिंकले होते. पीएसआय झेंडे यांनी दीड कोटी जिंकल्याची माहिती सगळीकडे पसरली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना मुलाखतीही दिल्या. दीड कोटी जिंकल्यामुळे पीएसआय झेंडे खूपच आनंदात होते. पण, हा आनंद क्षणिकच ठरला. कारण, पोलीस खात्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
पीएसआय सोमनाथ झेंडे यांना कोणत्या दोन चुका भोवल्या?
झेंडे यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई केल्याची नेमकी कारणे समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिली गोष्ट म्हणजे ड्युटीवर असताना झेंडे यांनी ऑनलाईन गेममधून पैसे मिळवले. दुसरी म्हणजे पोलिसाच्या वर्दीत असताना माध्यमांना मुलाखती देणे. सोमनाथ झेंडे यांनी केलेली कृती पोलिसांच्या पेशाला बाधा पोहोचवणाऱ्या आहेत, असा ठपका ठेवत पोलीस खात्याने ही कारवाई केली आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Lalit Patil : एक कॉल अन् ललित पाटीलचा झाला ‘गेम’; मुंबई पोलिसांनी कसं पकडलं?
सोमनाथ झेंडे ड्युटीवर असताना ड्रीम११ वर लावायचे टीम
पीएसआय झेंडे यांनी एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे ते ड्रीम११ वर ड्युटीवर असताना टीम लावायचे. हीच बाब पोलीस खात्याने गांभीर्याने घेतली आहे. तर त्यांनी दीड कोटी जिंकल्यानंतर माध्यमांना ज्या मुलाखती दिल्या, त्या पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये दिल्याची बाबीमुळेही ते अडचणीत आले आहेत.
हेही वाचा >> मुंबईत ऑनर किलिंग : आधी जावयाची सपासप वार करत हत्या, नंतर मुलीला ठेचून मारलं!
झेंडेंची होणार विभागीय चौकशी
सोमनाथ झेंडे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता झेंडे यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. त्या चौकशीवेळी झेंडे यांनी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT