Pimpri Chinchwad Crime : महिनाभरापूर्वी झालं होतं लग्न, पतीला शेतात घेऊन गेली अन्…
पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड भागात पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पती छळ करत असल्याने पत्नीने हे कृत्य केले. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आरोपी पत्नीस अटक केली आहे.
ADVERTISEMENT

–कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड
Pune Crime News in marathi : सुट्टीच्या दिवशी पतीला देवदर्शनासाठी घेऊन गेली आणि स्वतः चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. पतीच्या हत्या करून लोकांनी खून केल्याचा बनाव रचणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या.
पुण्याच्या मावळमध्ये (म्हळुंगे) पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याची खळबळ घटना समोर आली. या घटनेनंतर पत्नीने पतीची तीन ते चार जणांनी हत्या केल्याचा बनाव देखील रचला होता. परंतु, तळेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच पत्नीच्या संशयास्पद हालचाली आणि बोलण्याच्या विसंगतीवरून बेड्या ठोकल्या आहेत. सुरज काळभोर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अंकिता सुरज काळभोर ला तळेगाव पोलिसांनी अटक केलीय.
pune crime : पत्नीने का काढला पतीचा काटा?
सव्वा महिन्यापूर्वीच अंकिता आणि सुरजचा विवाह झाला होता. त्यांचे किरकोळ कारणावरून वाद होत असत. अशातच सुरज हा अंकिताचा शारीरिक छळ करायचा. तिला मारहाण करायचा. याच छळाला कंटाळून तिने पतीचा काटा काढायच ठरवलं.