Pune Accident : रँप करणारा 'तो' खरंच अल्पवयीन आरोपी आहे का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune porsche accident rap song viral rap song singer is not a minor accused
व्हिडिओतला मुलगा अल्पवयीन आरोपी नसल्याची बाब समोर आली आहे.
social share
google news

Pune Accident : पुण्यातील पोर्शे अपघातात दोन जणांचा हकनाक बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीने (बिल्डर पुत्राने) रँप साँग केल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. या रँपमध्ये ''बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल', असे साँग मुलगा बोलताना दिसला होता. हे रॅप साँग व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सतंप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पण आता या व्हिडिओतला मुलगा अल्पवयीन आरोपी नसल्याची बाब समोर आली आहे. (pune porsche accident rap song viral rap song singer is not a minor accused)

खरं तर एका तरुणाने खोडसाळपणे पुण्यातील पोर्शे घटनेवर रँप करून सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर अनेक माध्यमांमध्ये अल्पवयीन आरोपीने पुण्याच्या अपघाताच्या घटनेवर रँप केल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. या रँपमध्ये ''बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल', असे साँग मुलगा बोलताना दिसला होता. यानंतर सोशल मीडियावर आरोपी मुलावर कठोर शब्दात टीका होत होती. 

हे ही वाचा : आमदार धंगेकरांचा 'तो' खळबळजनक आरोप, पुण्यात नेमकं काय घडणार?

मात्र ज्या मुलाने रँप सॉग केला आहे. तो मुलगा अल्पवयीन आरोपी नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्या मुलाने हा रँप केला आहे. त्याच्या आईनेच याबाबतचा खुलासा केला आहे. तसेच ज्या मुलाने हा रँप सॉग तयार केला आहे, तो एक कंटेट क्रिएटर आहे. तसचे अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांनी देखील हे रँप त्यांच्या मुलाने केले नसल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे व्हिडिओत रँप गाणारा तरूण हा अल्पवयीन आरोपी नसल्याचे स्पष्ट होत आहे.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Dombivali Blast : डोंबिवली हादरली! बॉयलरच्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू

    follow whatsapp

    ADVERTISEMENT