Pune Accident : तीन मृतदेह, दोघं जिवंत रात्रभर विहिरीत…,अंगावर काटा आणणारा रिक्षा अपघात

ADVERTISEMENT

pune saswad story rickshaw fell into well newly married couple and girl dies two people rescue shocking story
pune saswad story rickshaw fell into well newly married couple and girl dies two people rescue shocking story
social share
google news

Pune Accident : पुणे जिल्ह्यातील सासवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लग्नाच्या दोनच दिवसांनी देवदर्शन करून परतताना नवविवाहित जोडप्याची रिक्षा थेट विहिरीत कोसळली होती. या अपघातात नवविवाहित जोडप्यासह एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहित विलास शेलार (वय 23), वैष्णवी रोहित शेलार (वय 18) आणि श्रावणी संदीप शेलार (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने विहिरीत कोसळून हा अपघात घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (pune saswad story rickshaw fell into well newly married couple and girl dies two people rescue shocking story)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील धायरी येथील शेलार कुटुंबात या नवविवाहित जोडप्याचा दोन दिवसांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर हे कुटुंब जेजुरीला खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन करून परतत असताना सासवडजवळ त्यांच्या रिक्षाचे ब्रेक फेल झाला. यामुळे रिक्षा जाऊन थेट 100 फुट खोल दरीत कोसळली होती.

या रिक्षातून नवविवाहित जोडप्यासह चालकासहीत दोन जण प्रवास करत होते.यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले, तर नवविवाहित जोडप्यासह एकीचा मृत्यू झाला.रिक्षा विहिरीत पडल्यानंतर दोघांनी मदतीसाठी हाक मारली. सुदैवाने सकाळी काही तरूणांनी ही हाक ऐकली आणि दोघांना वाचवण्यात यश आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mulund: ‘गुजराती माणसाने मराठी म्हणून जागा नाकारली’, महिलेला धक्काबुक्की; अजित पवार प्रचंड संतापले

खरं तर काल रात्री रिक्षा विहिरीत कोसळली होती पण आज सकाळपर्यंत कुणाच्याच लक्षात आलं नाही. आज गावातील काही तरुण विहिरीच्या काठी फिरायला आले असता आतून त्यांना कुणाच्यातरी ओरडण्याचा आवाज आला आणि मग त्यांनी पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशन करत आदित्य मधुकर घोलप आणि संगीता संदीप शेलार यांना विहिरीत सुखरूप बाहेर काढले. तर रोहित विलास शेलार (वय 23), वैष्णवी रोहित शेलार (वय 18) आणि श्रावणी संदीप शेलार (वय 17) मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दरम्यान लग्नानंतर सुखी आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवविवाहित जोडप्याचा विवाह अवघ्या दोनच दिवसांत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

नवदाम्पत्य जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते. रात्रीच्या परतीच्या प्रवासा दरम्यान मध्येच या नवदांपत्यासह शेलार परिवारावर काळाने घाला घातला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर शीतल संदीप शेलार आणि रिक्षाचालक अदित्य मधुकर घोलप असे दोन जण जखमी आहेत. या दोन्ही जखमींना सासवडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत,अशी माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ajit Pawar: दादा मुख्यमंत्री? मोहित कंबोज यांचे बोचणारे 8 शब्द, Tweet का केलं डिलीट?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT