Pune Rain Alert : पुणे पावसाच्या 'रडार'वर! मुंबईत कसे असेल हवामान? IMD चा अंदाज

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात हवामान कसे असेल?
पुणे आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

point

मुंबईत पावसाचा जोर ओसरणार

point

मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी

Mumbai Pune Weather Updates : राज्यात पावसाचा जोर ओसरण्यास सुरूवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई महानगर प्रदेश वगळता इतरत्र हवामान साधारण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील 24 तासांत पुणे शहर आणि जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतही मध्यम ते मुसळधार पाऊस काही ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. (IMD Issues Orange Alert for pune and satara)

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पाऊस होईल. विदर्भात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. 

पुणे, सातारा जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर, जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारीही (5 ऑगस्ट) शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ''मनोज जरांगे, श्याम मानव विरोधकांनी भाजपवर सोडलेले कुत्रे''

पश्चिम घाटाला लागून असलेल्या सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे पालघर या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तर मुंबईत वाऱ्याचा वेग वाढण्याचाही अंदाज आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा >> राहुल गांधींचा 'तो' फोटो शेअर केला अन् कंगनाच फसली जाळ्यात

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यातही काही भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, यलो अलर्ट जारी केला आहे.

ADVERTISEMENT

 

विदर्भातील 'या' जिल्ह्यांत पडणार पाऊस

अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ विदर्भातील या चार जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हवामान सर्वसाधारण राहील. त्याचबरोबर नंदूरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज नाही. 


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT