Anil Bonde : ''मनोज जरांगे, श्याम मानव विरोधकांनी भाजपवर सोडलेले कुत्रे''; भाजप खासदाराची जीभ घसरली
Anil Bonde Big statement : ''विरोधक सातत्यानं भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवीत असून त्यासाठी त्यांनी कुत्रे सोडले आहे, त्यातला पहिला श्याम मानव तर दुसरा मनोज जरांगे आहे अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
83 वर्षांचा म्हातारा हा मराठा समाजाचाच मुख्यमंत्री होता.
फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिले
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देखील लावला नाही
Anil Bonde Big statement : भास्कर मेहेरे, यवतमाळ : ''विरोधक सातत्यानं भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवीत असून त्यासाठी त्यांनी कुत्रे सोडली आहेत, त्यातला पहिला श्याम मानव (Shyam Manav) तर दुसरा मनोज जरांगे (Manoj Jarange) आहे'', अशी विरोधकांवर टीका करताना भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांची जीभ घसरली आहे. बोंडे यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.( anil bonde big statement on maratha reservation manoj jarange sharad pawar shyam manav maharashtra politics)
यवतमाळमध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात अनिल बोंडे बोलत होते. यावेळी विरोधकांवर टीका करताना अनिल बोडेंची जीभ घसरली होती."खोट नॅरेटीव्ह आपल्याला खोडणं आवश्यक आहे. गैरसमज पसरवणारा पसरवणारच आहे. फेक नॅरेटीव्ह फेक नॅरेटीव्ह करुन रडत बसण्यात अर्थ नाही. त्यांना खोट बोलण्याची सवय पडलीये ते खोट बोलणारच आहेत. आता ते एकटे खोट बोलणार नाहीत. त्यांनी आता अंगावर कुत्रे सोडले आहेत. एक श्याम मानवच्या रुपात सोडला की देवेंद्र फडणवीसांवर वाईट-वाईट बोल. एक मनोज जरांगे सारखा सोडला", असे भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे म्हणाले.
हे ही वाचा : Kangana Ranaut : राहुल गांधींचा 'तो' फोटो शेअर केला अन् कंगनाच फसली जाळ्यात
पुढे मराठा आरक्षणावर बोलताना अनिल बोंडे म्हणाले की, मनोज जरांगेला मी विचारतो अरे बाबा मराठ्याच आरक्षण, मराठ्याच आरक्षण करतो. आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते? यशवंतराव चव्हाण होते,वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण होते. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण होते. ज्याच्या सांगण्यावर तू बोलतोय. तोही 83 वर्षांचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता. तेव्हा शालिनीताई मराठ्याच आरक्षण मागत होत्या. तेव्हा काय झालं? शालिनीताई पाटलांच्या वेळेला मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Lakshya Sen : लक्ष्य हरला, पण प्रतिस्पर्धी भारतीयांची मन जिंकून गेला, सामन्यानंतर काय बोलला?
अनिल बोंडे पुढे म्हणाले, नरेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांचे वडिल आण्णासाहेब पाटील ते डिप्रेशनमध्ये गेले. शेवटी त्यांनी डोक्यात गोळी घालून शहिदत्व पत्करलं. मराठा मुख्यमंत्री असताना त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावस वाटलं नाही. 2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं. आपल्या विदर्भात मराठे 1 ते 2 टक्के आहेत. सगळे बाकीचे आहेत, ते कुणबी, तेली माळी आहेत. सुतार , कुंभार आहेत. बाकीचे सगळे आहेत. 252 जाती आहेत. तरिही देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला नाही.
ADVERTISEMENT