Lakshya Sen : लक्ष्य हरला, पण प्रतिस्पर्धी भारतीयांची मन जिंकून गेला, सामन्यानंतर काय बोलला?
Paris Olympic 2024 : उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा गत ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनशी सामना होणार होता. या सामन्यात पहिला गेम 20-20 असा बरोबरीत होता. पण अंतिमक्षणी व्हिक्टरने सलग दोन गुण मिळवत डाव जिंकला. त्यामुळे लक्ष्य सेनेने पहिला डाव 20-22 ने गमावला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा पराभव
हिक्टर एक्सेलसेनने 22-20, 21-14 असा पराभव केला.
लक्ष्य सेन कांस्यपदकाचा सामना खेळणार आहे.
Lakshya Sen vs Victor Axelsen : पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympic 2024) आठव्या दिवशी बँडमिंटन पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनला (Lakshya Sen) पराभव पत्करावा लागला आहे. उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या हिक्टर एक्सेलसेनने (Victor axelsen) 22-20, 21-14 असा पराभव केला. या सामन्यानंतर डेन्मार्कच्या खेळाडूने मोठं विधान केले आहे. त्याच्या या विधानाने त्याने लक्ष्य सेनसह भारतीयांची मन जिंकली आहेत. (paris olympic 2024 lakshya sen loss match victor exelsen won indian heart big statement after match)
उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा गत ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनशी सामना होणार होता. या सामन्यात पहिला गेम 20-20 असा बरोबरीत होता. पण अंतिमक्षणी व्हिक्टरने सलग दोन गुण मिळवत डाव जिंकला. त्यामुळे लक्ष्य सेनेने पहिला डाव 20-22 ने गमावला होता.
दुसऱ्या डावात लक्ष्य पुनरागमन करेल अशी आशा होती. त्याप्रमाणेच त्याने खेळ सूरू केला. दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यने आघाडी मिळवली. सुरुवातीला लक्ष्य 7-0 ने आघाडीवर होता. मात्र नंतर पुढे जाऊन लक्ष्यला आघाडी कायम ठेवता आली नाही. आणि लक्ष्यने दुसरा डाव 14-21 ने गमावला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Kangana Ranaut : राहुल गांधींचा 'तो' फोटो शेअर केला अन् कंगनाच फसली जाळ्यात
लक्ष्यने सामना गमावला असला तरी त्याने वर्ल्ड नंबर 2 व्हिक्टरला तगडी टक्कर दिली. व्हिक्टरसाठी हा विजय अजिबात सोपा नव्हता. लक्ष्यने त्याला तगडी टक्कर दिली होती.
दरम्यान या सामन्यानंतर व्हिक्टर एक्सएलसेनने भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनविरूद्धच्या पराभवानंतर त्याच्या कामगिरी पाहता मोठं वक्तव्य केलं आहे. व्हिक्टर म्हणाला, ''पुढील ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार लक्ष्य सेन असेल.''व्हिक्टरने त्याच्या या विधानाने भारतीयांची मन जिंकली आहे. या त्याची विधानाची आता चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान या पराभवानंतर आता लक्ष्य सेन कांस्यपदकाचा सामना खेळणार आहे. लक्ष्यकडून भारताला पदकाच्या आशा कायम आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mumbai Crime : मुलाच्या फ्लाईटचं तिकिट काढलं अन्...,पेडणेकर दाम्पत्याचा भयानक शेवट!
ADVERTISEMENT