Kangana Ranaut : राहुल गांधींचा 'तो' फोटो शेअर केला अन् कंगनाच फसली जाळ्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

kangana ranaut sharing morphed picture of rahul gandhi trend on twitter
कंगना रणौतने राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कंगनाने राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला

point

कंगनाने राहुल गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे.

point

या फोटोमुळे आता कंगनाच ट्रोल होतेय

Kangana Ranaut On Rahul Gandhi : बॉलिवूडची क्वीन आणि खासदार कंगना रणौतने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. कंगनाने राहुल गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टोपी घातली आहे, त्याच्या कपाळावर टिळा आहे आणि गळ्यात क्रॉस नेकले आहे. नुकत्याच संसदेत जातीय जनगणनेबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंगनाने (Kangana Ranaut) त्यांच्यावर टीका केली आहे. यानंतर आता कंगणाच सोशल मीडियावर ट्रोल होतेय. (kangana ranaut sharing morphed picture of rahul gandhi trend on twitter) 

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर राहुल गांधींच्या या मॉर्फ केलेल्या फोटोमुळे कंगना रणौतला प्रचंड ट्रोल केले जात आहे. कंगना रणौतने या पोस्टच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "जात जीव ज्यांना जात विचारल्याशिवाय जात जनगणना करायची आहे." खरं तर कंगना राणौत यांनी संसदेत राहुल गांधी यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला, ज्यात त्यांनी जात जनगणनेबाबत बोलले होते.

हे ही वाचा : "गौतम गंभीर जास्त दिवस टिकणार नाही, कारण...", माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

दरम्यान ही पोस्ट शेअर केल्यानंतर आता कंगणाचा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर या इन्स्टा स्टोरीवर अनेकांनी कंगना राणौतला घेरले आहे. अनेकांनी त्यांना संसदेसाठी अयोग्य असलेली ट्रोल म्हटले आहे. तसेच काही युझर्सनी तर यावरून म्हटले आहे की,कंगणा रणौतने राहुल गांधी यांचा मॉर्फ केलेला फोटो शेअर केला आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे, जेव्हा तिला कोर्टात खेचले पाहिजे. तसेच फक्त ऑनलाईन एफआयआर करून चालणार नाही. कंगना मानसिक आजाी आहे तिला शिक्षा दिली पाहिजे. 

हे वाचलं का?

 "लोक बघत आहेत... ते तुमच्या द्वेषाला नक्कीच उत्तर देतील, से ही उत्तर काही युझरनी दिले आहे.  तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने ट्विट केले की, "कंगना राणौतने जात जनगणनेच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे, पण तिच्याकडे तेजस, धाकड आणि थलायवी सारखे अनेक फ्लॉप चित्रपट केले आहेत. त्यामुळे स्वत:चे अपयश लक्षात घेता तिने इतरांना ट्रोल करू नये, अशा शब्दात देखील नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे. 

हे ही वाचा : Mumbai Crime : मुलाच्या फ्लाईटचं तिकिट काढलं अन्...,पेडणेकर दाम्पत्याचा भयानक शेवट!

दरम्यान याआधी देखील कंगना रणौतने राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते स्वतः जाहीररित्या कुणाचीतरी जात विचारत आहेत. या व्हिडीओसह त्यांनी एक कॅप्शनही लिहिले आहे. त्या म्हणाल्या. स्वतःच्या जातीचा यांना पत्ता नाही. आजोबा मुस्लीम, वडील पारशी, आई ख्रिश्चन आणि हा पास्तामध्ये कडीपत्त्याचा तडका देऊन तयार केलेल्या खिचडीसारखा वाटतो. याला दुसऱ्यांची जात जाणून घेऊन काय करायचे आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT