Govt Jobs : पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर पदांची भरती, इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना सुवर्णसंधी, 'असा' करा अर्ज

मुंबई तक

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. पीएनबी बँकेत भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची काय प्रक्रिया आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर पदांची भरती

point

इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना सुवर्णसंधी

point

'असा' करा अर्ज

Government Jobs : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) 'ऑफिसर' पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर्सची निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑफिसर सिव्हिल इंजिनिअर पदासाठी 21 जागा, ऑफिसर इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी 7 जागा आणि ऑफिसर मेकॅनिकल इंजिनिअर पदासाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कोठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

पात्रतेचे निकष

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) किमान 60% गुणांसह B.E. किंवा B.Tech ही पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवारांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. वयाची अट 1 जानेवारी 2026  रोजी 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान ठेवण्यात आली असून, शासकीय नियमांनुसार SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा

अर्ज कसा करावा?

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासाठी जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 1080 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी केवळ 59 रुपये शुल्क आकारले जाईल. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे आहे. या भरतीसाठीची परीक्षा 27 मे रोजी घेतली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ( https://pnb.bank.in/ ) सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम सुरु, नियोजित वेळेसाठी वाहतूक सेवा बंद

इतका सिबिल स्कोअर असेल तरच..

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आपला क्रेडिट इतिहास (Credit history) चांगला राखला असल्याची खात्री करावी आणि बँकेत रुजू होताना त्यांचा सिबिल (CIBIL) स्कोअर किमान 681 किंवा त्यापेक्षा जास्त असावा. ज्या उमेदवारांची सिबिल स्थिती (CIBIL status) रुजू होण्याच्या तारखेपूर्वी अपडेट केलेली नसेल, त्यांना एकतर सिबिल स्थिती अपडेट करून घ्यावी लागेल किंवा ज्या खात्यांमुळे सिबिलवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, त्या खात्यांबाबत कोणतीही थकबाकी नसल्याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर करावे लागेल; तसे न केल्यास नियुक्तीचा प्रस्ताव मागे घेतला किंवा रद्द केला जाऊ शकतो. ज्या उमेदवारांचे कोणतेही बँक खाते नाही, त्यांना सिबिल स्थिती सादर करण्याची आवश्यकता नसेल. अर्ज करण्यासाठी सिबिल स्कोअरची अट ही पूर्वअट नाही.
 

हे वाचलं का?