Ram Mandir : ‘6 डिसेंबरच्या रात्री गुपचूप खाल्ले होते केशरी पेढे’, IAS मनिषा म्हैसकरांची पोस्ट व्हायरल
मनिषा म्हैसकर या सनदी अधिकारी आहे.नुकतीच शिंदे-फडणवीस सरकारने सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली होती. यामध्ये मनिषा म्हैसकर यांचा देखील समावेश होता.
ADVERTISEMENT

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते सोमवारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर विधिवत पद्धतीने रामलल्ला मंदिरात विराजमान झाले होते. प्राणप्रतिष्ठेचा हा संपूर्ण सोहळा अख्ख्या देशाने टिव्हीवर पाहून आनंदोत्सव साजरा केला होता. असे असतानाचा आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर (manisha mhaiskar) यांची एक फेसबूक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात. (ram mandir pran pratishtha ias manisha mhaiskar facebook post viral pm narendra modi ayodhya)
मनिषा म्हैसकर यांची पोस्ट जशीच्या तशी
जय श्री राम
आयुष्याचं वर्तुळ पूर्ण होतं आणि…तेही कसं!
6 डिसेंबर 1992 हा मसुरीतला अतिशय थंडीचा दिवस होता. 1992 ची आयएएस बॅच त्यांच्या फाऊंडेशन कोर्ससाठी होती.
अयोध्येतील रामजन्मभूमीवरील महत्वाच्या घडामोडीच्या बातम्या हळूहळू पसरत होत्या. त्यावेळी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतू ही केवळ निमंत्रीतांसाठी बैठक होती. माझी नागपूरशी घट्ट जुळेलेली नाळ निमंत्रक म्हणून पूरेशी मानली गेली होती.या बैठकीत जय श्री रामाचा जयघोष सुरू होता आणि पेढे वाटले जात होते. मला एक केसर पेढा खाल्ल्याचे आठवते आणि त्याक्षणी 6 डिसेंबर 1992 च्या अत्यंत थंड रात्री मला माहिती होते की अयोध्येतील घडामोडी ही कशाची तरी सूरूवात आहे. खूप सकारात्मक, खूप शक्तिशाली आणि खूप शूभ…
हे ही वाचा : Uddhav Thackeray : “…आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत”
या गोष्टी नेहमी होतात तशा पेढे वाटून खाल्ल्याची बातमी फुटली आणि एकच खळबळ उडाली. नोटीसा बजावण्यात आल्या. जातीयवादी घटक आयएएसमध्ये घुसखोरी करत आहेत, असे सांगण्यात आले होते.