Ratan Tata passes away: रतन टाटा यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी! तुम्हालाही नसतील माहित...
Ratan Tata passes away : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झालंय. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रतन टाटा यांच्या जीवनातील 'त्या' रंजक गोष्टी!
Ratan Tata passes away : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झालंय. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेरीस बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख गोळवाला यांच्या देखरेखीखाली रतन टाटांवर उपचार करण्यात येत होते. इतकंच नाही तर ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील चौथा मजला हा रतन टाटा यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांचं निधन झाल्याने भारतासह जगभरात त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जातोय.
86 वर्षीय रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 3800 कोटींच्या व्यापाराचं साम्राज्य असताना त्यातील 65 टक्के संपत्ती दान केल्याने टाटांची जगभरात चर्चा झाली होती. परिणामी त्यांना या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून ओळखलं गेलं. 2008 साली भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्वविभूषण देऊन रतन टाटांचं गौरव करण्यात आला होता. याशिवाय ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, ऑर्डर ऑफ ब्रिटिश यांसारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही टाटांना मिळालेले आहेत.
हेही वाचा : Ratan Tata Passed Away: भारताने गमावला दिलदार उद्योगपती, रतन टाटांचं निधन
रतन टाटा यांच्या जीवनातील 'त्या' रंजक गोष्टी!
1937 मध्ये जन्मलेले रतन टाटा यांचे आई-वडील 1948 मध्ये वेगळे झाल्यानंतर त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी त्यांचे पालनपोषण केले.
रतन टाटा यांनी 1962 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून B.Arch पदवी प्राप्त केली. 1962 च्या उत्तरार्धात भारतात परतण्यापूर्वी त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये जोन्स आणि इमन्स यांच्यासोबत काही काळ काम केले.