Ratnagiri: नीलिमा चव्हाणचा नेमका मृत्यू कसा झाला?, पोलिसांनी दिली मोठी माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

ratnagiri how exactly did neelima chavan die dabhol police gave big information crime news update
ratnagiri how exactly did neelima chavan die dabhol police gave big information crime news update
social share
google news

Neelima Chavan Death: गोकूळ कांबळे, दाभोळ: दापोली (Dapoli) येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा चव्हाण (Neelima Chavan) हिचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. मात्र, याबाबत एक अत्यंत मोठी अपडेट आता समोर आली आहे. दाभोळ पोलिसांनी (Dabhol Police) याबाबत एक नवी माहिती दिली आहे. त्यानुसार प्रथमदर्शनी नीलिमाची हत्या (Murder) झाली नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय नीलिमाचा मृतदेह जेव्हा आढळून आला होता तेव्हा तिचे केस आणि भुवया नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, तिचे केस आणि भुवया कोणीही काढले नसल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. (ratnagiri how exactly did neelima chavan die dabhol police gave big information crime news update)

नीलिमाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती..

दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी दाभोळच्या खाडीत मृत अवस्थेत मिळालेल्या नीलिमा चव्हाणचे अनुषंगाने दाभोळ पोलीस स्टेशन अधिक तपास करीत असून आजवरच्या तपासात प्रथम दर्शनी निष्पन्न झालेल्या बाबी खालील प्रमाणे:

1. नीलिमा हिचा शवविच्छेदन (Postmortem) रिपोर्ट प्राप्त झाला असून त्यामध्ये नीलिमाच्या शरीरावर कुठल्याही मृत्यूपूर्व जखमा तसेच अंतर्गत जखमा (Internal Injuries) दिसून आलेल्या नाहीत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2. Postmortem Notes मध्ये डॉक्टरांनी Viscera तपासणी करिता राखीव ठेवला असून लवकरच Viscera तपासणी रिपोर्ट प्राप्त होताच मृत्यूचे कारण निश्चित होणार आहे.

हे ही वाचा >> Honeytrap : पत्नीच्या मैत्रिणीनेच न्यूड व्हिडिओ बनवून…; LIC एजंटसोबत काय घडलं?

3. Viscera रिपोर्ट प्रथम प्राधान्याने मिळावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून लघु-न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोग शाळा, रत्नागिरी यांच्याशी पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे.

ADVERTISEMENT

4. Academic Dean & Prof. and Head, Forensic Medicine & Toxicology, Seth GS Medical College & KEM Hospital, Parel Mumbai यांच्याकडून पोलीसांनी मागविलेल्या अभिप्रायामध्ये, “डोक्यावरचे केस व भुवयांचे केस जाण्याचे कारण हे केशवपनामुळे नसून शवाच्या कुजण्याच्या शक्यतेमुळे” असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

ADVERTISEMENT

5. आतापर्यंत नीलिमा चव्हाणसोबत हॉस्टेलमध्ये राहणार्‍या मैत्रिणी, कॉलेजच्या मैत्रिणी, नोकरीच्या ठिकाणी असणारे, तिचे वरिष्ठ व सहकारी, बँकेतील नोकरवर्ग, पूर्वी नोकरीच्या ठिकाणी असणारे व्यक्ती, प्रवासादरम्यान भेटणारे एस. टी. कंडक्टर, शेवटी पाहणारे, व CCTV footage मध्ये दिसणारे, स्थानिक मच्छीमार असे विविध 104 साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या चौकशीत तसेच भरणे नका, खेड येथील CCTV footage व जगबुडी नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी वावर असलेल्या महत्वाच्या स्थानिक साक्षीदारांकडे करण्यात आलेल्या प्राथमिक पोलीस तपासात घातपाताचा पुरावा नाही.

हे ही वाचा >> Crime:हातोडीनं वार,रिक्षात बसवून नदीत…,तीन मेहूण्यांनी मिळून दाजींची हत्या का केली?

6. नीलिमा चव्हाण हिची बॅग हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून ऑपरेशन बॅग सर्च सुरू आहे. त्यामध्ये 4 होड्या, 2 ड्रोन, Binoculars तसेच 80 पोलिसांची 8 पथकांद्वारे शोध मोहीम सुरू आहे.

आजवरच्या तपासात प्रथमदर्शनी कोणताही घातपात झाल्याबाबत माहिती अथवा तथ्ये समोर आलेली नाहीत. पोलीस तपास अजूनही चालू असून साक्षीदारांकडे कसून चौकशी चालू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT