‘…मग सत्तेत राहायचं कशाला?’, अजित पवारांची एन्ट्री, संजय शिरसाट काय बोलले?
2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राला राजकीय धक्का बसला. आम्ही महायुतीत आलो असून, एकत्रच राहणार आहोत, असं अजित पवारांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT

Maharashtra News, Shiv Sena : अजित पवारांनी भाजपसोबत बस्तान बसवलं, पण टेन्शन वाढलं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं, अशी चर्चा सुरू झालीये. शिवसेना नेत्यांकडूनच यावर भूमिका मांडण्यात आल्यानंतर हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. एक भाकर मिळणार होती. आता अर्धी मिळेल, असं सांगताना शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची नाराजी लपून राहिली नाही. त्यानंतर प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही भूमिका मांडली. त्यांनी असाच सूर आवळला.
2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राला राजकीय धक्का बसला. आम्ही महायुतीत आलो असून, एकत्रच राहणार आहोत, असं अजित पवारांनी स्पष्ट केले. पण, यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला तडतोडी स्वीकाराव्या लागणार असं बोलण्यास सुरूवात झाली आहे.
संजय शिरसाट म्हणाले, अजित पवारांना का घेतलं?
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाट म्हणाले की, “आम्हाला बहुमताची गरज नव्हती. मग का घेतलं? हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सगळा आकडा 172 पण गेलेला असताना यांना घ्यायची गरज काय आहे? परंतु राजकारणात काही समीकरणं बसवताना, मग ती येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि प्रत्येकाची एक ताकद असते. पक्ष असतोच. पण, त्याची स्वतःची एक ताकद असते. ही ताकद एकत्र झाल्यानंतर या जागा वाढणार आहेत.”
वाचा >> Shiv Sena: अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे गटाला छळतेय ‘ही’ भीती; वाचा Inside Story
दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितलं की, “आज जे मंत्रिमंडळ झालंय, या मंत्रिमंडळामुळे काही लोकांच्या… आता आमचेच काही कार्यकर्ते असे आहेत की, का झालं, कसं काय झालं, हे का झालं, ते झालं असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. मग हे मंत्रिमंडळ चालेल कसं. यांना एवढी मंत्रिपद दिली. तुम्हाला काय मिळणार, त्याला काय मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांकडे (देवेंद्र फडणवीस) आहेत. हा प्लॅन करून केलेला आहे. आता या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता या रविवारपर्यंत दुसरा विस्तार मंत्रिमंडळाचा होईल”, अशी माहिती त्यांनी दिली.