Sambhaji Bhide : संभाजी भिडे पुन्हा बरळले, महिला म्हणाल्या, ''भिडेच्या मिशाच कापून टाकू''

मुंबई तक

ADVERTISEMENT

 sambhaji bhide controversial statement on vatpournima pooja sharad pawar ncp vidya lolage angree
भिडेंच्या या विधानानंतर आता मोठा वाद पेटला असून महिला वर्ग आक्रमक झाला आहे.
social share
google news

Sambhaji Bhide Controversial Statement : विजयकुमार बाबर, सोलापुर:  ''वटसावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, असे विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे  (Sambhaji Bhide) यांनी केले होते. भिडेंच्या या विधानानंतर आता मोठा वाद पेटला असून महिला वर्ग आक्रमक झाला आहे. त्यामुळे  ''भिडे गुरुजींनी महिलांबाबत वादग्रस्त विधान करू नये, अन्यथा त्यांच्या मिशा कापून टाकू'' असा इशारा सोलापूर शहरातील विधवा संघटनेच्या अध्यक्षा आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विधवा संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे (vidya lolage) यांनी दिला आहे. (sambhaji bhide controversial statement on vatpournima pooja sharad pawar vidya lolage angree)   

ADVERTISEMENT

विधवा महिलांसाठी "वर्ल्ड ऑफ वुमेन्स (wow)"संघटनेच्या स्थापनेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विद्या लोलगे यांनी भिडे गुरुजींवर शाब्दिक हल्ला चढवलाय. पत्रकारांनी यावेळी संभाजी भिडे यांनी वटपौर्णिमेबाबत बोलताना ड्रेस घातलेल्या महिलांनी वटपूजनाला जाऊ नये असे विधान केले होते. या विधानावर बोलताना विद्या लोलगे यांनी 'भिडे गुरुजींनी महिलांबाबत वादग्रस्त विधान करू नये, अन्यथा सर्व महिला मिळून त्यांच्या मिशा कापतील' असा इशारा दिला आहे.

हे ही वाचा : 'भ@ माझ्याकडे हात...', दानवेंची BJP आमदारला भर सभागृहात शिवीगाळ

दरम्यान घरातील कर्त्या पुरुषाचे अकाली निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर मोठा आघात होतो. विशेषतः त्यांच्या पत्नी आणि लहान मुलांवर, अशा संकटग्रस्त महिलांना आधार देऊन त्यांना संघटित करून त्यांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी संघटना स्थापन करण्यात आली असल्याची माहिती विद्या लोलगे यांनी दिली.

हे वाचलं का?

संभाजी भिडे विधान काय? 

 ''वटसावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. तसेच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते हांडग स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. संभाजी भिडे यांच्या या विधानानंतर मोठा वाद पेटला आहे. 

हे ही वाचा : Lonavala Bhushi Dam : पिकनिक बेतली जीवावर, कुटुंबच गेले वाहून; व्हिडीओची संपूर्ण स्टोरी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT