ज्येष्ठ नागरिकांचा एसटीतून मोफत प्रवास, शिंदे सरकारची जाहिरात चर्चेत का?
सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना जाहीर केली, आता त्याबद्दल केलेल्या दाव्यावरून प्रश्न उपस्थित केला गेला आहे.
ADVERTISEMENT

Shinde Fadnavis Government : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झालंय. यानिमित्ताने सरकारकडून जोरदार जाहिरातबाजी करण्यात आलीये. वर्षभराच्या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांना लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या जाहिरातीमध्ये एक चूक लोकांनी समोर आणलीये. सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना जाहीर केली, आता त्याबद्दल केलेल्या दाव्यावरून प्रश्न उपस्थित केला गेला आहे. (Shinde Fadnavis government completed one year on june, 30 )
‘हे राज्य व्हावे सुराज्य ही जनतेची इच्छा’, या मथळ्याखाली शिंदे सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीत सरकारने वर्षभर केलेल्या घोषणा आणि घेतलेल्या निर्णयांवर प्रकाशझोत टाकला आहे. यात एक निर्णय आहे, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा.
सरकारचा दावा काय?
सरकारने जाहिरातीत दावा केला आहे की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्ष पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत. आतापर्यंत 10 कोटीपेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये ज्येष्ठांना लाभ.”
हेही वाचा >> Senthil Balaji : राज्यपाल मंत्र्याची हकालपट्टी करू शकतात, कायदा काय सांगतो?
हीच जाहिरात पोस्ट करत दिलीप डिसुझा नावाच्या व्यक्तीने एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात की, “महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 13 कोटी आहे. आज मला कळलं की त्यापैकी 10 कोटी लोकं म्हणजे 77 टक्के लोकसंख्या ज्येष्ठ प्रवासी आहेत.”