NCP : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, पुण्यातील आयटी इंजिनिअरला अटक

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी एका आयटी अभियंत्याला मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. आरोपी बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे.

ADVERTISEMENT

IT engineer arrested from Pune for threatening to kill NCP President Sharad Pawar.
IT engineer arrested from Pune for threatening to kill NCP President Sharad Pawar.
google news

Sharad Pawar Death Threat Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी एका आयटी अभियंत्याला मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. आरोपी बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बर्वेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फेसबुकवरून धमकी दिल्याचा आरोप आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमक्या मिळाल्यानंतर पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

‘तुमचा लवकरच दाभोलकर होणार’ अशा प्रकारची धमकी एका पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली होती. फेसबुकच्या धमकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शुक्रवारी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात वेगळा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, ज्या आयपी अॅड्रेसवरून पोस्ट अपलोड करण्यात आली होती, तो बर्वे यांचा असल्याचे गुन्हे शाखेला आढळून आले.

हेही वाचा >> वारकऱ्यांवरील लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, ‘मविआच्या काळात…’

शरद पवार यांना धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी सरकारने गांभीर्याने घेतली असून चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगितले होते.

हे वाचलं का?