शिंदेंच्या शिवसैनिकांची भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, कल्याणमध्ये काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

shiv sena workers beaten to bjp worker who painted lotus on wall in kalyan.
shiv sena workers beaten to bjp worker who painted lotus on wall in kalyan.
social share
google news

Maharashtra politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातच भाजप-शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा समोरासमोर आले आणि नको तेच घडलं. याला निमित्त ठरलं कल्याण पूर्वमधील चक्की नाका परिसरात भाजपचे चिन्ह. त्यामुळे आता भाजपही आक्रमक झाली आहे. नेमकं काय घडलं, तोच वाद समजून घ्या.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र आले. दोन्ही पक्षाचे नेते आमच्या सर्व चांगलं असल्याचे दावे करताहेत. पण, कार्यकर्त्यांमध्ये मात्र वेगळं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत वाद शिलगला होता. त्यावर पडदा पडल्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेत.

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये काय घडलं?

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपामध्ये कुरबुर सुरूच असल्याचे दिसून येतंय. कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजपा कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजपच्या पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले.

हे वाचलं का?

वाचा >> Lok Sabha Election 2024: मोदीच येणार, पण…; नव्या सर्व्हेने भाजपचं वाढलं टेन्शन!

त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केलाय.

वाचा >> Nawab Malik : शरद पवार-अजित पवारांनी लावली ताकद; मलिकांसाठी इतकी चढाओढ का?

यावेळी भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी ‘तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू’, असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिलाय. भाजप शहर अध्यक्षासह कार्यकर्ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. घडल्या प्रकाराबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

भाजप नेत्याने काय सांगितलं?

कल्याण पूर्वमधील माजी नगरसेवक अजूनही स्वतःला नगरसेवक समजत आहेत. त्यांना एकच सांगतो, भाजपला संधी दिली नाही तर यापुढे कामच होणार नाही. कमळ निशाणी आणि फिर एक बार मोदी सरकार असं पेटिंग करत असताना 20-25 जणांनी मल्लेश शेट्टी आणि विकास चौधरी यांच्या सांगण्यावरून लाठ्या काठ्या घेऊन मारहाण केली. भाजप शिंदे गटाला एकच सांगेन तुमचे नगरसेवक आवरा नाहीतर, आम्ही पण हात सोडू’, असा इशारा भाजप कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT