Shravan 2024 : श्रावणात शिवलिंगावर करा ऊसाचा रस अर्पण, मिळेल 'हे' सुख!
Shravan 2024 : महादेवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण असतात. वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिना पवित्र मानण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
 
 शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने काय होते?
 
 शिवलिंगावर तीळ आणि जवस का केले जाते?
 
 उसाचा रस शिवलिंगावर अर्पण केल्याने कोणते सुख मिळते?
Shravan 2024 : महादेवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण असतात. वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिना पवित्र मानण्यात आला आहे. या महिन्यात काही खास उपाय केल्याने जीवनात सुख-समृद्धी कायम राहते आणि याचे फळ दुप्पट मिळते. (Shravan 2024 What are the benefits of Sugarcane juice abhishek on shivling)
श्रावणात भगवान शंकराचे नामस्मरण आणि मनोभावे पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होते. त्याचबरोबर जीवनात असलेली सर्व संकटं दूर होतात. याशिवाय प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाचे व्रत केले जाते. श्रावण सोमवारी काही उपाय केल्यास सर्व त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग हे उपाय कोणते आहेत जाणून घेऊयात...
हेही वाचा : महायुतीत रंगलं महाभारत! तानाजी सावंतांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्यानंतर NCP ला संताप अनावर!
शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने काय होते?
श्रावण महिन्यात घरात शिवलिंग ठेवत असाल तर ईशान्य कोपऱ्यात ठेवा. ही दिशा देवी- देवतांची असल्याने शुभ मानली जाते. या दिशेला भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख- समृद्धी येते. तसेच सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते.
त्याचबरोबर देव पूजेत अक्षता म्हणजे तांदूळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शिव पूजेमध्ये शिवलिंगावर अखंड तांदूळ अर्पण केल्यास लक्ष्मी कृपेने धनलाभ होतो.














