महायुतीत रंगलं महाभारत! तानाजी सावंतांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्यानंतर NCP ला संताप अनावर!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तानाजी सावंतांच्या ‘त्या’ खळबळजनक वक्तव्यानंतर NCP आक्रमक!

point

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते?

point

अमोल मिटकरींनी तानाजी सावंतांचा घेतला चांगलाच समाचार


Tanaji Sawant On NCP : 'राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात,' असं खळबळजनक वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. आता या वादग्रस्त वक्तव्यानंतर महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा तानाजी सावंत यांना देण्यात आला आहे. (ncp makes me vomit shiv sena minister tanaji sawant serious statemaent on ajit-pawar NCP now leaders of NCP  aggressive on him

तर, तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अशी  प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. 'आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, महायुतीत राष्ट्रवादी ही तानाजी सावंत यांच्यामुळे नाहीये.  उलट महायुती झाली म्हणून आज तानाजी सावंत हे मंत्री झालेत.  पण अशा पद्धतीने ते बोलणार असतील तर पक्षनेतृत्वाकडे विनंती करतो की आपण यातून बाहेर पडलेले बरे...' असंही उमेश पाटील म्हणाले. 

हेही वाचा : Maharashtra Weather:महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट! तुमच्या शहरात आज IMD चा अंदाज काय?

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते?

नागरिकांशी संवाद साधतानाचा तानाजी सावंतांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही,' असं तानाजी सावंत यांनी यामध्ये वक्तव्य केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमोल मिटकरींनी तानाजी सावंतांचा घेतला चांगलाच समाचार

तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानावर आमदार अमोल मिटकरी म्हणाले, 'तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. ते आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील.'

हेही वाचा : Gold Price Today: सोन्याचा भाव पाहूनच म्हणाल, बाई... हा काय प्रकार? जाणून घ्या 1 तोळ्याची किंमत

 

त्याचबरोबर ट्वीट करत मिटकरींनी तानाजी सावंत यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी लिहिले की, 'जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात , हाफकिन संस्थेला माणुस म्हणु शकतात,इतकंच काय आपला बुम ता. परंडा जि. धाराशिव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करू शकतात, दादांकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलु शकतात. #मळमळमंत्री'

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT