Sunil Tatkare : मंत्रिमंडळाच्या विस्तारबाबत तटकरेंचं मोठं विधान, उंचावल्या भुवया!
Sunil Tatkare : राज्य मंत्रिमंडळाची संभाजीनगरमध्ये बैठक सुरु असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर महत्वाचे वृत्त सांगितले आहे. सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसून सरकार अनेक कार्यक्रमात व्यस्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Expansion of Cabinet : राज्याचे राजकारण अनेक मुद्यांनी ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशााध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर महत्वाची गोष्ट सांगितले आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, सरकारच्या व्यस्त कार्यक्रमामुळे गणेशोत्सवाआधी होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) आता आणखी लांबणीवर पडला आहे. सध्याच्या वेगवेगळ्या घडामोडींमुळे आता होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार गणेशोत्सवानंतर होईल असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. (state cabinet expanded after ganeshotsav, state president sunil tatkare)
ADVERTISEMENT
मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर
राज्य सरकार सध्या अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन, मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रम आणि मंत्रिमंडळाची बैठक या कार्यक्रमामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. त्यामुळे सध्या तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असे स्पष्ट संकेत सुनील तटकरे यांनी दिला आहे. तटकरे यांनी हा कार्यक्रम लांबणीवर पडणार असल्याचे सांगत भविष्यात अनेकांना मिळणारी संधीही लांबणीवर गेल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले
सरकारचे व्यस्त कार्यक्रम
राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार आता मराठवाड्यात होत असलेल्या मंत्रि मंडळाच्या बैठकीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे मराठा आंदोलनाच्या निर्णयावरही सरकार ठोस निर्णय घेणार असल्याने त्यामध्येही सरकार लक्ष घालून आहे. मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमाचे मोठे आयोजन सरकारने केले आहे. या कारणामुळेही सरकार आपल्या कामात गुंतले आहे.
हे वाचलं का?
निर्णय अजित पवार घेणार
सुनील तटकरे यांनी 2019 च्या निवडणुकीची आठवण करुन देत त्यावेळी नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही आम्ही जिंकून आलो होतो. त्यामुळे आता भविष्यातील निवडणुकीबाबत मात्र रायगड लोकसभा मतदार संघात कोण उमेदवार द्यायचा याबाबतचा निर्णय मात्र अजित पवार घेतील असंही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपप्रणीत महायुतीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार गटावर प्रचंड टीका झाली. त्यावर स्पष्टीकरण देताना सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही कुणीही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडलेला नसल्याचे सांगत त्यांनी आमच्या विचारांशी पक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT