सुषमा अंधारेंच्या अश्रुंचा फुटला बांध! शरद पवारांकडे केली अजित पवारांची तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

sushma andhare cried in the award ceremony. complaint to sharad pawar about ajit pawar, says as leader of opposition he didn't raised the issue in maharashtra assembly.
sushma andhare cried in the award ceremony. complaint to sharad pawar about ajit pawar, says as leader of opposition he didn't raised the issue in maharashtra assembly.
social share
google news

एरवी सत्तांधाऱ्यांवर तुटून पडणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अश्रुंचा बांध फुटला. शरद पवारांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारेंनी विरोधकांकडून खालच्या पातळीवर टीका होत असल्याची खंत व्यक्त केली. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाच्या अनुषंगाने अंधारेंनी विरोधी पक्षनेत्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केली नसल्याची तक्रार शरद पवारांकडे केली.

ADVERTISEMENT

भारतीय भटके-विमुक्त विकास संशोधन संस्थेमार्फत फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. जकातवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी सुषमा अंधारेंना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले आणि रडतच त्यांनी भाषण केलं.

शरद पवारांसमोर सुषमा अंधारेंचं शरद पवारांसमोर भाषण, काय म्हणाल्या?

“आदरणीय साहेब, हे आपल्यासमोर फार धाडसाने याच्यासाठी मांडलं पाहिजे. आता ज्या पद्धतीने… इथे राजकारणाचा विषय नाही, पण आवर्जून सांगितलं पाहिजे. अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. मला अपेक्षित होतं सर. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. का ती एफआयआर लिहून घेतली नाही. खरं की खोटं नंतर. सगळा मजकूर सार्वजनिक आहे. तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. माझं चुकत असेल, तर आपण कान पकडा. मी लाखवेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे”, असं सांगताना सुषमा अंधारेंच्या अश्रुंचा बांध फुटला. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला नाही म्हणून खंत वजा तक्रारही पवारांकडे केली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Thackeray vs Shinde : ‘सुप्रीम’ निकाल कुणाच्या बाजूने? या आहेत 4 शक्यता

पुढे त्या म्हणाल्या “हे का बोललं पाहिजे सर. आमचा तसाही कुणी आधार नाहीये. आम्ही राजकारणात आलोय, मंत्रीपद वगैरे काहीच डोक्यात नाहीये सर. आलो की याच्यासाठी भटक्यांना कुणीतरी आधार दिला पाहिजे. काहीतरी असलं पाहिजे, आमचे प्रश्न चव्हाट्यावर मांडणारं कुणीतरी असलं पाहिजे. पुरस्कार वगैरे मिळेल, असं काही माझ्या डोक्यातच नाहीये. कारण मला माहितीये जे व्यवस्थेची भलामण करतात, व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते. जे व्यवस्थेची चिरफाड करून प्रश्न विचारतात, व्यवस्था त्यांना बहिष्कृत ठरवते. त्यामुळे माझ्यासारख्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाला कुणी पुरस्कार द्यावेत ही अपेक्षाही नाही. ही माझी भडक्यातील, भिकारपंथातील माणसं आहेत”, अशा शब्दात त्यांनी भाष्य केलं.

ADVERTISEMENT

माझ्या बोलण्यात रग आहे, कारण माझ्या जगण्यात धग आहे -सुषमा अंधारे

“सर, आम्हाला पुरस्कारापेक्षा काय अपेक्षित आहे. माफ करा सर सगळे जण म्हणतात सुषमा अंधारेंच्या बोलण्यात फार रग आहे. होय, सर माझ्या बोलण्यात रग आहे. कारण माझ्या जगण्यात धग आहे. धगीचं आयुष्य मी जगून आलेय. त्यामुळे रगेलपणा माझ्या भाषेत जाणवू शकतो सर. काय काय पद्धतीने बोलाव कुणी कुणी?”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “आ गए गद्दार”, शरद पवार शिंदेंवर बरसले, मोदींवरही चढवला हल्ला!

“अरे माझ्या बापापर्यंत जाता तुम्ही. वाटेल त्या पद्धतीने बोलता. सर लोक आपल्याला आधारवड म्हणतात. आपण राजीनामा दिला त्यादिवशी पत्र लिहिलं होतं. तेव्हढंच वाचणार आहे. हे पत्र मला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे कारण मला तुमचा राजीनामा नको होता आणि म्हणून मी हे पत्र लिहिलं होतं”, असं सांगत त्यांनी पत्र वाचून दाखवलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT