Telecom Service Rule : कॉल, इंटरनेट सेवा झाली बंद, तर मिळणार नुकसान भरपाई, वाचा नवीन नियम
Telecom Service Rule : पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात ग्राहकांना नेटवर्क संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत अनेकदा तक्रार करून देखील ती सोडवली जात नाही. त्यामुळेच आता ट्रायने आता एक नवीन नियम आणला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मोबाईल आणि ब्रॉडबँड युझर्ससाठी मोठी बातमी
टेलिकॉम कंपन्यांना दणका देणारा निर्णय ट्रायने घेतला
नेमका नियम आहे काय?
Telecom Operators to Compensation to Customers: मोबाईल आणि ब्रॉडबँड युझर्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोबाईल आणि ब्रॉडबँड युझर्सना नेटवर्क संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या प्रकरणात तक्रार करूनही काहीच हाती लागत नाही. अशा प्रकरणात टेलिकॉम कंपन्यांना दणका देणारा निर्णय ट्रायने घेतला आहे. नेमका हा नियम काय आहे? तो जाणून घेऊयात. (telecom operators will have to compensate customer by fine in case of service outages)
पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात ग्राहकांना नेटवर्क संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत अनेकदा तक्रार करून देखील ती सोडवली जात नाही. त्यामुळेच आता ट्रायने आता एक नवीन नियम आणला आहे.
जर टेलिकॉम कंपन्यांनी क्वॉलिटी स्टॅडर्डचं पालन केलं नाही तर त्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. पूर्वी दंडाची रक्कम 50 हजार होती, ती वाढवून आता 1 लाख करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा निर्णय टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी डोकेदुखी ठरू शकतो.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki bahin Yojana : 19 ऑगस्टला मिळणार पैसे, तुमचा अर्ज कुठंपर्यंत पोहोचला; कसे बघणार?
ट्रायने आपल्या जून्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार दंडाची रक्कम विविध स्वरूपात विभागण्यात आली आहे. ब्रॉडबँड आणि वायरलाइन, वायरलेस सर्व्हिसेस रेग्युलेशन, 2024 चे उल्लंघन केल्यास ही रक्कम भरावी लागणार आहे. दंडाची रक्कम 1 लाख, 2 लाख, 5 लाख आणि 10 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच आता दंडही वेगळ्या पद्धतीने निश्चित करण्यात आला आहे.
ट्रायच्या नव्या नियमानुसार एखाद्या जिल्ह्यात नेटवर्क बंद झालं तर टेलिकॉम कंपन्यांना त्रास होणार आहे. हा फायदा प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना मिळणार आहे. आता त्यांना कनेक्शनची वैधता वाढवून मिळणार असून त्यासाठी त्यांना काहीही करावं लागणार नाही. परंतू या बंदसाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच एखाद नेटवर्क 24 तास ठप्प राहिल्यास टेलिकॉम कंपन्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.
ADVERTISEMENT
ट्रायच्या या नवीन नियमाचा ग्राहकांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे हा नियम केवळ मोबाईल कंपन्यांनाच नाही तर ब्रॉडबँड प्रोव्हाडर्सनाही लागू होणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Fadnavis Thackeray : "उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा...", फडणवीसांनी सोडला बाण
ADVERTISEMENT