Nagpur: एकुलता एक मुलगा गमावला.. भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव
Nagpur stray dogs: नागपूरमध्ये एका तीन वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. ज्यामध्ये त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
Nagpur: नागपुरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली आहे. येथे घराबाहेर खेळणाऱ्या एका निष्पाप बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून चिमुकल्याची सुटका केली अन् त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण तोवर चिमुकल्याचा मृत्यू झाला.. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. (terror of stray dogs in nagpur three year old child playing outside the house was torn to death)
ADVERTISEMENT
नागपूरच्या मौदा तालुक्यातील गणेश नगर भागात ही घटना घडली आहे. वंश अंकुश शहाणे (वय 3 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. घटनेच्या वेळी वंशचे वडील हे कामावर गेले होते तर आई घरातील कामात व्यस्त होती. खेळता खेळता वंश हा घराबाहेरील गेटजवळ आला, जिथे आधीच २-३ भटकी कुत्री होती. वंशला एकटा पाहून या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.
हे ही वाचा>> Nagpur : भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
शेजाऱ्यांनी कुत्र्यांपासून केली वंशची सुटका
कुत्र्यांनी चावा घेतल्याने वंश हा जीवाच्या आकांताने रडून लागला. त्याच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांचे शेजारी आणि जवळच राहणारे लोक हे तिथे धावतच पोहचले.. त्यांनी तात्काळ भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून वंशची सुटका केली आणि उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण निष्पाप वंशचा मृत्यू झाला. वंश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत घबराटीचे वातावरण आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> चादर गुंडाळूनच बाहेर पडली, बोलवावी लागली रूग्णवाहिका; अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
मानेची नस दाबल्याने बालकाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्यांनी वंश यांच्या मानेचा चावा घेतला. पण त्याच वेळी वंश याच्या मानेजवळची एक मुख्य नस तुटली आणि त्यामुळेच वंशचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपुरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची ही पहिलीच घटना नाही. याआधीही भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक बालकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झाले आहेत. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT