Nagpur : भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू

योगेश पांडे

ADVERTISEMENT

nagpur shocking story women killed in stampade bjp nagpur event kotwali police
भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे
social share
google news

Nagpur Women Killed In Stampede : योगेश पांडे, नागपूर :  शहरात भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मनु तुलसीराम राजपूत असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेसह चार जण या घटनेत गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना आज सकाळी शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  (nagpur shocking story women killed in stampade bjp nagpur event kotwali police) 
 
भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानांच्या वितरणाच्या शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता या शिबीराला सुरुवात होणार होती. मात्र सकाळच्या 7 वाजल्यापासूनच या कार्यक्रमासाठी नागरीकांची गर्दी जमायला सुरूवात झाली होती. पुढे जाऊन कार्यक्रमाला खूपच गर्दी झाली होती.

हे ही वाचा : फडणवीसांनी शाहांना रात्री 2 वाजता का केलेला फोन?

या दरम्यान सभागृहाचे दार उघडताच सगळ्यांनी एकच धाव घेतली. यामध्ये गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. अनेक महिला खाली पडल्या. मनु राजपूत देखील खाली कोसळल्या आणि त्यांच्या अंगावरून अनेक जण गेले होते. या घटनेनंतर मनु राजपूत यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. 

आज तकशी बोलताना कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी रेशीमबाग परिसरातील सुरेश भट सभागृह संकुलात ही घटना घडली. कार्यक्रमात कार्यकर्त्यांना भांडी वाटप करण्यात येणार होती, त्यामुळे कार्यक्रमस्थळी महिलांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान बराच वेळ कार्यक्रम सुरू न झाल्याने तेथे मोठी गर्दी झाली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 'गुवाहाटीसाठी भास्कर जाधव बॅग घेऊन तयार होते'

या चेंगराचेंगरीत मनु तुलसीराम राजपूत खाली कोसळल्या होत्या. या घटनेनंतर त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुदमरणे आणि हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या घटनेनंतर भाजपचे कार्यकर्ते यंत्रणेतील बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगत आहेत. तर हजारोंच्या गर्दीला सांभाळण्याची व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचे महिला सांगत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT