पत्नी अन् आईचं डोकं वीटेने ठेचून खून केला, अन् सिकंदर गुप्ता दोघींचं मांस खात होता.. ; पोलिसांना भयंकर दृश्य दिसलं

मुंबई तक

Crime News : अटक केल्यानंतर मेडिकल तपासणीसाठी सिकंदरला रुग्णालयात नेण्यात आलं. तेथेही त्याने असभ्य वर्तन केलं. त्याने डॉक्टरांच्या तोंडावर थुंकल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, थुंकताना त्याच्या तोंडातून रक्तासह मांसाचा तुकडाही बाहेर पडल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे हत्या केल्यानंतर मृतांचं मांस खाल्ल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी अन् आईचं डोकं वीटेने ठेचून खून केला

point

अन् सिकंदर गुप्ता दोघींचं मांस खात होता.. ;

point

पोलिसांना भयंकर दृश्य दिसलं

Crime News : पत्नी आणि स्वत:च्या आईची अत्यंत अमानुषपणे हत्या करुन युवकाने त्यांचं मांस खाल्ल्याची धक्कादायक घटना कुशीनगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सिकंदर गुप्ता असं या दुहेरी हत्याकांडांतील आरोपीचे नाव आहे. 32 वर्षीय सिकंदर गुप्ता मुंबईत शटरिंगचे काम करणारा करायचा. काही महिन्यांपूर्वीच आपल्या मूळ गावी परसा येथे परतला होता. मात्र, परतल्यानंतर घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास सिकंदर गुप्ता आपल्या 60 वर्षीय आई रूना देवी आणि पत्नी प्रियंका यांच्यासोबत घराच्या छतावर शेकटी पेटवून ऊब घेत बसला होता. यावेळी सिकंदर दारूच्या नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. याच दरम्यान पती-पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. हा वाद काही वेळातच टोकाला गेला. यावेळी रागाच्या भरात सिकंदरने जवळच असलेला दगड उचलून पत्नी प्रियांकाच्या डोक्यावर जोरदार घाव घातला. या हल्ल्यात प्रियंका गंभीर जखमी झाली. हा प्रकार पाहून आई रूना देवी घाबरल्या आणि त्यांनी मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या सिकंदरने आईलाही सोडलं नाही. त्याने त्याच दगडाने आईच्या डोक्यावरही वार केला. इतक्यावरच सिकंदर थांबला नाही. तो दोघींच्या डोक्यावर दगडाने घाव घालत राहिला. काही वेळात दोघींचाही मृत्यू झाला आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाहायला मिळाल्या.

हेही वाचा : नाशिक : आपच्या उमेदवारावर विरोधी कार्यकर्त्याने बंदूक उगारली, पण स्थानिकांनी त्यालाच दिला चोप, पाहा व्हिडीओ

घटनेदरम्यान मोठा गोंधळ आणि आरडाओरड झाली. शेजाऱ्यांना संशय येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचताच सिकंदर अधिकच आक्रमक झाला. त्याने छतावरून पोलिसांवर दगडफेक केली. मोठ्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी छतावर जाऊन त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी सिकंदरच्या हातांवर रक्त पडलेलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, छतावर दोन्ही महिलांचे मृतदेह विद्रूप अवस्थेत पडले होते. काही प्रत्यक्षदर्शींनी आरोपी मृतांचं मांस इथे-तिथे फेकत असल्याचंही सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp