जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर भ्याड दहशतवादी हल्ला,10 जणांचा मृत्यू!
Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुंफा तीर्थक्षेत्रातून कटरा येथे परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हल्ला झालेल्या भाविकांसोबत नेमकं काय घडलं?

दहशतवादी हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू, 33 जण जखमी

वरिष्ठ पोलीस अधीक्षक काय म्हणाले?
Jammu & Kashmir Terrorist Attack : एकीकडे राजधानी दिल्लीत रविवारी (9 जून) मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुंफा तीर्थक्षेत्रातून कटरा येथे परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांचा हाच गट राजौरी, पुंछ आणि रियासीच्या वरच्या भागांमध्ये लपून बसला आहे. (terrorist attack on bus of devotees in Jammu and Kashmir 10 people died more than 30 are injured)
घटनास्थळावरील दृश्यांमध्ये स्थानिक लोक बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसून आले. तसेच रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी रस्त्याच्या कडेला येऊन उभ्या आहेत.
हेही वाचा: PM Modi new cabinet minister list 2024 : असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी
हल्ला झालेल्या भाविकांसोबत नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6.10 च्या सुमारास राजौरी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या रियासी जिल्ह्यातील पौनी भागात दहशतवाद्यांनी शिवखोडीहून कटरा येथे जाणाऱ्या प्रवासी बसला टार्गेट केले. यावेळी गोळी लागल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी रात्री 8.10 वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना बाहेर काढले.
दहशतवादी हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू, 33 जण जखमी
रियासी पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांनी लोकांच्या बचाव प्रक्रियेवर देखरेख केली. यावेळी 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. तर 33 जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले, ज्यामध्ये 13 जणांना जिल्हा मुख्यालय रुग्णालय रियासी येथे तर, 5 जणांना सीएचसी त्रेयाथ आणि 15 जणांना जीएमसी जम्मूमध्ये दाखल करण्यात आले. त्याचवेळी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त सुरक्षा दलाची मोहीम राबवून परिसर सील करण्यात आला. हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी बहुआयामी कारवाई सुरू करण्यात आली आहे.