भयंकर... काश्मीरमध्ये पर्यटकांवर झाडल्या गोळ्या, महाराष्ट्रातील जखमी पर्यटकांची यादी आली समोर!

मुंबई तक

Pahalgan Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. बर्फाच्या डोंगरात घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला.

ADVERTISEMENT

Pahalgam Terrorist Attack News
Pahalgam Terrorist Attack News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील कुटुंबावर दहशतवाद्यांनी केला गोळीवर 

point

जखमी झालेल्या पर्यटकांच्या नावाची यादी वाचा

point

पर्यटक घोडेस्वारी करत असतना दहशतवाद्यांनी केला गोळीबार

Pahalgan Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. बर्फाच्या डोंगरात घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 12 लोक जखमी झाले आहे,अशी सूत्रांची माहिती आहे. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजते. पुण्यातील एका कुटुंबातील पाच जणांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. दरम्यान जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

 बैसरन परिसरात काही पर्यटक घोडेस्वारी करत डोंगरभागात जात होते. त्याचदरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोर आर्मी किंवा पोलिसांच्या वर्दीत होते. त्यामुळे त्यांना कोणी ओळखू शकला नाही. या हल्ल्यात फक्त पर्यटकांनाच गोळी लागली नाही. तर अनेक घोडेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. हल्ला झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. पर्यटन त्यांच्या जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळून जात होते.

पुण्यातील कुटुंबावर दहशतवाद्यांनी केला गोळीवर 

पुण्यातील एका कुटुंबातील पाच जणांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. एका व्यक्तीला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर उर्वरित नागरिकही जखमी झाले आहेत. 

हे ही वाचा >> Pune News : वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू! बेजबाबदार डॉक्टरवर गुन्हा दाखल

जखमी झालेल्या पर्यटकांची नावे

विनोद भट - (गुजरात)

हे वाचलं का?

    follow whatsapp