Thane: ‘असं कुणासोबत वागू नका’, तरुणाने ट्रॅफिक पोलिसांमुळं घेतला स्वतःचा जीव
Thane youth Suicide drunk and drive case: ठाण्यातील एका 23 वर्षीय तरुणाने ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात पोलिसांनी पकडल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून झालेल्या जाचानंतर आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Thane youth Suicide: विक्रांत चौहान, ठाणे: भारतीय लष्कर (Indian Army) आणि पोलीस दलात (Police Force) भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने ड्रँक अँड ड्राईव्ह (Drunk and Drive) प्रकरणात अडकल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या वर्तणुकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मतदारसंघातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष उतेकर या तरुणाने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये मनीषने काही वाहतूक पोलिसांची (Traffic Police) नावे देखील लिहिली आहे. तसेच या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (thane traffic police drunk and drive case 23 year old man committed suicide city news thane)
ADVERTISEMENT
मनिषला सैन्यात किंवा पोलीस खात्यात भरती होऊन देशसेवा करायची होती, पण आता या दोन्ही दलात भरती होण्याआधीच मनीषने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. ड्रंक अण्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपलं करिअर धोक्यात येऊ शकतं या एका भीतीनेच त्याने आत्महत्येसारखं अत्यंत टोकाचं पाऊल उचललं.
मनीषची सुसाइड नोट जशीच्या तशी
मनीषने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, ‘गटारीच्या दिवशी त्याने आणि त्याच्या मित्राने दारूचे सेवन केले होते. ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात दारूच्या नशेत गाडी चालवताना वाहतूक पोलिस मोरे साहेबांनी त्याला पकडले. मी सैन्य भरतीसाठी परीक्षा देणार आहे आणि पोलीस खात्यात भरतीसाठी परीक्षा देणार आहे. असं त्यांना सांगितलं. ज्या दिवशी आमची गाडी पकडली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही लोकं उद्या या. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो आणि माफी मागितली आणि दंडाची कितीही रक्कम असेल ती भरायला तयार झालो. मात्र पोलिसांनी आम्हाला धमकावत कोर्टात जावे लागेल, असे सांगितलं.’
‘खरं तर ज्या दिवशी आम्हाला पकडलं तेव्हाच आमच्यासमोर इतरही बाइक चालकांना पकडलं होतं. पण त्यांच्याकडून थोडे-बहुत पैसे घेत सोडून देण्यात आलं होतं.’
तिसर्या दिवशी मी परत गेलो आणि माफी मागितली, मी म्हणालो सर, दंडाची कितीही रक्कम असेल तर मी भरायला तयार आहे. पण प्रकरण कोर्टात गेले तर माझे करिअर संपेल. पण ट्रॅफिक पोलीस सुधाकर आणि पुष्कर सर मला धमकी देऊ लागले. आम्हाला तुझं करिअरच बरबाद करायचं आहे असं ते म्हणू लागले. याच भीतीपोटी मी आज आत्महत्या करत आहे.
‘भविष्यात असे कोणाचेही आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे. जी परिस्थिती आज माझ्यावर आली आहे ती उद्या कुणावरही येऊ नये. म्हणून मी हे पाऊल उचलत आहे.’
‘ती गाडी माझ्या मित्राची आहे, त्याचा काहीही दोष नाही, मी ट्रॅफिक पोलीस सुधाकर साहेब आणि ट्रॅफिक पोलीस पुष्कर साहेब यांच्या दबावामुळे आत्महत्या करत आहे.’
‘अनाथांचे नाथ एकनाथ यांनी आम्हाला न्याय द्यावा…’
दरम्यान, आता मनीषच्या आत्महत्येने दु:खी झालेले हे कुटुंब आपल्या मृत भावाला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याचना करत आहेत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Pune Acp गायकवाडांचं रक्त का खवळलं, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येची Inside Story
यावेळी मृत मनीषचा मोठा भावाने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘आज माझा धाकटा भाऊ या जगात नाही, याचे आम्हाला दु:ख आहे. पण मी प्रशासनाला विनंती करतो, तसेच मुख्यमंत्री जे अनाथांचे नाथ एकनाथ असं म्हणतात… त्यांना देखील विनंती करतो की, या प्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा.
‘हो आम्ही दारू प्यायलो होतो, पण..’
दरम्यान, याप्रकरणी मृत मनीषचा मित्र आणि प्रत्यक्षदर्शी अमृत कोरे याने याबाबत सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला, ‘त्या दिवशी आम्ही दारू प्यायलो होतो, आम्ही ती गोष्ट स्वीकारतो. आम्ही त्यांच्यासोबत हुज्जत घातली हे देखील आम्ही स्वीकारतो. मी आणि मनीषने दारूचं सेवन केलं की याची चाचणी घेतली. ज्यामध्ये आम्ही दोषी आढळून आलो. दरम्यान, काही लोकांनी जास्त दारू सेवन केलेलं असतनाही मशीनमध्ये रिपोर्ट 20 टक्के निगेटिव्ह येत होता. ज्याबद्दल आम्ही म्हणालो की, सर तुमचे मशीन खोटे रिपोर्ट दाखवत आहे. याच गोष्टीचा त्यांना खूप राग आला.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Nargis Delhi : भयंकर! मावशीच्या मुलीचा रॉडने गार्डनमध्येच पाडला मुडदा; कारण…
‘हे सगळं झाल्यानंतरही आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा वाहतूक पोलिसांकडे गेलो आणि माफी मागितली. म्हणालो साहेब, जे काही झालं त्याबद्दल आम्हाला माफ करा. पण त्यावेळी त्यांची भाषा ही अत्यंत खालच्या दर्जाची होती. ते म्हणाले की तुझं करिअरच बरबाद करतो.. तुझी सैन्यात भरती कशी होते तेच आम्ही बघतो. एवढंच नव्हे तर त्या पोलिसांनी असंही म्हटलं की, तू एकनाथ शिंदेंशी बोलला तरी तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. याच सगळ्या दबावामुळे अखेर माझ्या मित्राने आत्महत्या केली.’ असे आरोप मनीषच्या मित्राने यावेळी वाहतूक पोलिसांवर केले आहेत.
ADVERTISEMENT
पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच- वाहतूक पोलीस उपायुक्त
दरम्यान, याप्रकऱणी आम्ही वाहतूक पोलिसांची बाजू देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकरणाबाबत – वाहतूक पोलीस विभाग ठाणेचे उपायुक्त विनयकुमार राठोड म्हणाले की, मनीष उतेकर आणि त्याचे मित्र हे बाइकवरुन ट्रिपल सीट जात होते. यावेळी मनीषच्या शरीरात अल्कोहोल आढळून आलं. त्यामुळे वाहतूक पोलिसांची कारवाई कायदेशीरच होती. तसंच ड्रंक अँड ड्राइव्हची केस कोर्टातच जाते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना दंड घेऊन सोडण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले असते. त्यामुळे मनीषने अशा प्रकारे आत्महत्या करणे हे चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT