Video : अंगावर धावले..,खुर्च्यांची फेकाफेक…, ग्रामसभेत दोन गटात तुफान राडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Two groups stormed in the gram sabha sarnobatwadi kolhapur
Two groups stormed in the gram sabha sarnobatwadi kolhapur
social share
google news

कोल्हापूरच्या (kolhapur) सरनोबतवाडी (sarnobatwadi) ग्रामसभेत दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली. हा राडा इतका भयाणक होता की दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले, एकमेकांच्या अंगावर खुर्च्याची फेकाफेकी केल्या आहेत. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या संपूर्ण राड्यानंतर दोन्ही गटातील लोकांनी आपआपल्या लोकांना मागे घेऊन राडा मिटवला होता. (they ran over each other threw chairs Two groups stormed in the gram sabha sarnobatwadi kolhapur)

ADVERTISEMENT

ग्रामसभेत (gram sabha) गावचा विकास आणि विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून ग्रामसभा घेण्यास सुरूवात झाली. मात्र मूळ प्रश्न बाजूला ठेवून विरोधाला विरोध करण्याच्या वृत्तीमुळे सध्या ग्रामसभेत राड्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी गावात ग्रामसभेत असाच प्रकार घडला आहे. दत्त मंदिराच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ग्रामसभेत चर्चा सुरु होती. या दरम्यान सभेत दोन गटात राडा झाला. त्यातूनच दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि खुर्च्याच्या फेकाफेकीची घटना घडली.

हे ही वाचा : साखरपुड्यानंतर बलात्कार… लग्न दुसऱ्या मुलीशीच, नवरदेवाची पोलिसांनीच काढली वरात!

सरनोबतवाडीच्या (sarnobatwadi) बुधवारी आयोजित केलेल्या सभेदरम्यान दत्त मंदिराच्या जागेच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यातूनच माजी सरपंच उत्तम माने यांचा गट आणि विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांच्या आडसूळ गटात वादाची ठिणगी पडली. त्यातूनच दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. एकमेकांवर अक्षरशः सभागृहातील खुर्च्या फेकून मारल्या. या राड्यादरम्यान एकाच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार मात्र दाखल झालेली नाही.

हे वाचलं का?

ग्रामसभा ही गावातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर एकत्र येऊन चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यासाठी व्हाव्यात, असा एक नियम आहे. शासनाने यासाठीच ग्रामसभेचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. मात्र राज्यातील अनेक ठिकाणच्या ग्राम सभेवेळी नेमकं याच्या विरुद्ध चित्र दिसून येतं. विकासाचं नाव आणि गाव दुरच राहतं आणि विरोधाला विरोध होतो हे नेहमी समोर आले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : लग्न केलं पण शारीरिक संबंधच ठेवले नाही, वैतागलेल्या बायकोने…

दरम्यान याआधी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा 26 जानेवारीला आयोजित होती. या नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पहिल्याच सभेत राडा झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT