“या माणसाने देशाचे वाटोळे…”, जितेंद्र आव्हाड भडकले, अण्णा हजारे खेचणार कोर्टात
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर अण्णा हजारेंनीही त्यांना आता न्यायालयात खेचणार असा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या नेत्यांपैकी जितेंद्र आव्हाड हे एक महत्वाचे नेते. घडणाऱ्या घटनांबद्दल सातत्याने त्यांनी सातत्याने आपले मत सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून व्यक्त केले आहे. आताही त्यांनी एक्स/ट्विटरवर (X) समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्याबद्दल पोस्ट करत वादाला तोंड फोडले आहे. अण्णा हजारेंबद्दल,’ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी (Mahatma Gandhi) होत नाही’ ट्विट करत त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र हा वाद आता अण्णा हजारेपर्यंत गेले असून त्यांनीही आता जितेंद्र आव्हाड यांना थेट इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
टोपी घातली म्हणजे…
राज्यासह देशात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आज एकीकडे राष्ट्रवादी कुणाची यावर सुनावणी असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी हजारेंबद्दल ट्विट केल्याने हा वाद आणखी पेटणार असल्याचे दिसून येत आहे. अण्णा हजारे यांच्या गांधी टोपीबद्दल त्यांनी ट्विट केल्याने अण्णा हजारेंनीही त्यांना आता अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा >> मुंबईत अग्नितांडव, गोरेगावातील भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू
आक्रमक पवित्रा
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर अण्णा हजारेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा त्यांना इशारा दिला आहे. माझ्यामुळं देशाचे वाटोळे झाले असे म्हणायचे मात्र मी केलेल्या कायद्यामुळे जनतेचा फायदाच झाल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे.
हे वाचलं का?
ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले
टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही pic.twitter.com/hDLIsSW8g9— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 5, 2023
ADVERTISEMENT
आव्हाडांचा पलटवार
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांना म्हटले आहे की, माझ्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाटोळे झाले असल्याचा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. अण्णा हजारे यांच्यावर ट्विट केल्यानंतर आणि त्याला हजारेंनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा एक जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> NCP Controversy: राष्ट्रवादी कुणाची ? आज काका-पुतणे आमनेसामने…
कोर्टात खेचणार
अण्णा हजारे यांच्यावर पहिले ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दुसरे ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, माझ्या ट्विटनी ह्यांना जाग आली आहे. कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले बघू उद्यापासून जागे राहतात का असा सवाल करत त्यांनी अण्णा हजारेंचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT